शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

वानखेडेबाहेर ‘ब्लॅक गेम’

By admin | Published: March 31, 2016 3:13 AM

सलामीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा सर्वांनी जवळजवळ सोडल्या होत्या. मात्र यजमानांनी यानंतर फिनिक्सभरारी घेत उपांत्य

- महेश चेमटे,  मुंबईसलामीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा सर्वांनी जवळजवळ सोडल्या होत्या. मात्र यजमानांनी यानंतर फिनिक्सभरारी घेत उपांत्य फेरी गाठलीच. विशेष म्हणजे भारतातील ‘क्रिकेटपंढरी’ मानल्या जात असलेल्या मुंबईत टीम इंडियाची लढत होत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सामन्यासाठी सुरू असलेल्या तिकिटांच्या काळ्याबाजारामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.टीम इंडियाची उपांत्य फेरी निश्चित होताच तिकीट मास्टर्सची वेगळीच खेळी सुरू झाली. वानखेडेवर होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी सांगेल ती किंमत मोजणार, याची पूर्ण कल्पना असलेल्या तिकीटमाफियांनी क्रिकेटप्रेमींना कोंडीत पकडून तिकिटांची किंमत अव्वाच्या सव्वा केली आहे. त्यामुळे सामन्याआधी दोन दिवसांपासूनच ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या टोळी वानखेडे स्टेडियमभोवती सक्रिय झाले आहेत. प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर क्रिकेटप्रमींना तिकीट उपलब्ध होत नाही. पण ब्लॅकने मात्र तिकीट मिळत आहे. मात्र त्यासाठी खिसा चांगलाच रिकामा करावा लागत आहे. ‘‘वानखेडेवर सामना असल्याने खूप उत्सुक आहे. रविवारपासून तिकिटांसाठी स्टेडियमबाहेर फेऱ्या मारतोय. पण तिकीट उपलब्ध नाहीत. पण ब्लॅकमध्ये सर्रास तिकिटांची विक्री होत आहे,’’ अशी प्रतिक्रिया एका क्रिकेटप्रमीने दिली, तर ‘‘कोहलीची फटकेबाजी प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मी जास्तीत जास्त सहा ते सात हजार रुपये मोजायला तयार आहे. पण १० हजार खूप होतात,’’ अशी खंतही एकाने व्यक्त केली. असा आहे ब्लॅक तिकिटांचा भाव...                                   मूळ किंमतब्लॅक किंमतसुनील गावसकर स्टँड     एक हजार रुपये १३ हजार रुपयेनॉर्थ स्टँड                     दीड हजार रुपये१५ हजार रुपयेगरवारे स्टँड                  १० हजार रुपये३० हजार रुपयेतिकीटमाफिया आणि क्रिकेटप्रेमींतील संवादक्रिकेटप्रेमी : तिकीट मिलेगा क्या?तिकीटमाफिया : हां... सुनील गावसकर स्टँड का मिलेगा, लेकिन १३ हजार लगेगा.क्रिकेटप्रेमी : कुछ कम नहीं हो सकता?तिकीटमाफिया : सस्ते में चाहिए तो घर पे बैठके टीव्ही पे मॅच का मजा ले.