शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

‘ब्लास्टर’ची बरोबरी !

By admin | Published: October 27, 2014 2:03 AM

सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या केरळा ब्लास्टर संघाने आज, रविवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आश्चर्यकारक निकालाची नोंद केली

कोलकाता : सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या केरळा ब्लास्टर संघाने आज, रविवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर आश्चर्यकारक निकालाची नोंद केली. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या आणि एकही पराभव न पत्करणाऱ्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाला त्यांनी १-१ असे बरोबरीत रोखून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या बरोबरीमुळे ब्लास्टरने इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये आपले गुणांचे खाते उघडले. विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानावर उतरलेल्या कोलकाताने घरच्या मैदानाचा फायदा उचलत सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. फिकरू लेमेसा याच्या अनुपस्थितीत उतरलेल्या कोलकाताच्या आक्रमणात त्रुटी आढळत होत्या. गोवा एफसी विरुद्धच्या लढतीत शिस्तभंग केल्यामुळे फिकरूवर ही कारवाई करण्यात आली. तसेच प्रशिक्षक अंटोनियो लोपेझ यांच्यावर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या कोलकातासाठी केरळा संघाविरुद्धची ही लढत तितकिशी सोपी नव्हती. केरळाचा बचाव आणि आक्रमण दोन्ही दमदार असल्याने कोलकाताला घरच्या मैदानावरही चांगलीच मेहनत घ्यावी लागली. २०व्या मिनिटाला केरळाच्या राफेल रोमेय याने कोलकाताच्या जोफ्रेची जर्सी ओढून त्याला पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पंचांनी त्याला पिवळे कार्ड दाखविले. २२व्या मिनिटाला कोलकाताने गोल करून केरळाला हादरा दिला. बलजित साहनी याने बोर्जाचा पासवर गोल करून यजमानांना १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांमधील आक्रमकता आणखीनच वाढली. २८व्या मिनिटाला जोफ्रेने केरळाच्या खेळाडूंना चकवत गोलपोस्टपासून ६ मीटर अंतरावर पोहोचला; परंतु त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. ३५ व्या मिनिटाला जोफ्रे गोल करण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी केरळाच्या केड्रीच हेंगबर्ट याने अप्रतिम टॅकल करून त्याला रोखले. ४१व्या मिनिटाला केरळाला जल्लोष करण्याची संधी मिळाली. इयान ह्यूम याने चेंडूवर ताबा कायम राखत कोलकाताचा बचाव भेदून गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आला. मध्यांतरानंतर कोलकाताने बिस्वजित सहायाच्या जागी जाकूब पोडनी याला एन्ट्री देत रणनीतीत बदल केला. ५३व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर जोफ्रेने चेंडू साहनीकडे टोलवला आणि तो चेंडू गोलपोस्टच्या बारला लागल्याने गोल करण्याची संधी हुकली. ६२व्या मिनिटाला साहनी याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. ६६व्या मिनिटाला केवीन लोबो याच्याऐवजी राकेश मसिह याला पाचारण करून कोलकाताने आक्रमण आणखी वाढवले. सामना जसजसा पुढे सरकत होता, तशी चुरस आणि ओढाताण आणखीन वाढत होती. त्याचा प्रत्यय ७३व्या मिनिटाला आला. केरळाच्या ह्यूमने कोलकाताच्या साहनी याला चुकीच्या पद्धतीने टॅकल करून पाडले आणि दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडले. पंचांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. पंचांनी ह्यूमला या कृत्याबद्दल पिवळे कार्ड दाखवून वॉर्निंग दिली. त्यानंतर सामन्यात चुरस पाहायला मिळाली नाही आणि ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. (वृत्तसंस्था)