मुंबई- गेली दहा वर्षे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापासून वंचित राहलेल्या शरीरसौष्ठवपटूंना पुरस्कार मिळवून देण्यासाठी चेतन पाठारेंच्या संघटनेला सोडण्याचा मुंबईतीलशरीरसौष्ठव संघटनांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाच्या पाठीशी मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंची अख्खी ताकद उभी राहिली आहे.
गेली दहा वर्षे मुंबईसह महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. तरीही महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनला आपल्या एकाही दिग्गज खेळाडूला पुरस्कार मिळवून देता आलेले नाही. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी आणि त्यांना पुरस्कार मिळवून देण्यासाठी मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या सर्वच्या सर्व पदाधिकार्यांनी राज्य बॉडीबिल्डिंग संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स संघटनेचे सर्वेसर्वा संजय मोरे यांच्यात सामील झाल्यामुळे मुंबईतील शेकडो दिग्गज खेळाडू निश्चिंत झाले होते आणि त्यांनी मुंबई संघटनेला आपला पाठिंबा दर्शवत आपली पूर्ण ताकद त्यांच्यासोबत उभी केली आहे.
मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची वाढली ताकद
महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनशी संलग्न झाल्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा परिषदेची मान्यता. या मान्यतेमुळे आता मुंबईतील शरीरसौष्ठवपटूना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळू शकणार. इंडियन बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनला ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता असल्यामुळे एशियन बीच गेममध्येही सहभागी होता येणार.
इंडियन बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन ही इंटरनॅशनल फिटनेस आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशनला वाडा, स्पोर्ट्स अॅकॉर्ड, वर्ल्ड गेम असोसिएशन यांची मान्यता असलेली शरीरसौष्ठव क्षेत्रातील एकमेव संघटना.
सव्वाशे शरीरसौष्ठवपटूची फौज सोबत
मुंबईतील शरीरसौष्ठव संघटनांनी खेळाडूंना पुरस्कार मिळवून देण्यासाठी संजय मोरेंच्या मान्यताप्राप्त संघटनेशी आपली संघटना संलग्न करताच त्यांनी सत्यस्थिती सांगण्यासाठी मुंबईतील सर्वच शरीरसौष्ठवपटूंना बोलावले. तेव्हा मुंबईतील सव्वाशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंची उपस्थिती भारावून सोडणारी होती. खेळाडूंच्या न्यायासाठी मुंबईतील संघटनांनी उचललेल्या घेतलेल्या भूमिकेला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला