शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

शरीरसौष्ठव स्पर्धा : पुण्याचा महेंद्र चव्हाण ‘अटल महाराष्ट्र श्री’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 3:14 AM

अनिल बिलावाला उपविजेतेपद; महिलांमध्ये अमला ब्रह्मचारी, दीपाली ओगले अजिंक्य

सातारा : येथील तालीम संघाच्या मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने ‘अटल महाराष्ट्र श्री’चा किताब पटकविला, तर मुंबईच्या अनिल बिलावा याने उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसले. मुंबईच्या अमला ब्रह्मचारीने सलग दुसऱ्यांदा ‘मिस महाराष्ट्र’चा बहुमान पटकावला, तर महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात उपनगरची दीपाली ओगले ‘मिस महाराष्ट्र’ठरली.

शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पवार यांनी ‘महाराष्ट्र श्री’च्या माध्यमातून सातारकरांना शरीरसौष्ठवाची पीळदार मेजवानी दिली. दहा हजार क्रीडाप्रेमींच्या साक्षीने पुण्याच्या महेंद्र्र चव्हाण याने ‘महाराष्ट्र श्री’चा किताब जिंकला. विविध गटातून आलेल्या दहा विजेत्यांमध्ये ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’साठी सात पोझेस झाल्या.

मुंबईच्या अनिल बिलावाचे कडवे आव्हान मोडीत काढीत पुण्याच्या महेंद्र चव्हाण याने १६ व्या ‘महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. त्याला रोख दीड लाख रुपये, चषक, प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत मुंबईने सांघिक विजेतेपद आणि उपविजेतेपदही पटकावले. पुरस्कार वितरण सोहळ्याला भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंतराव गायकवाड, जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांतराव आपटे आदी उपस्थित होते

महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या अमला ब्रह्मचारीचाच दबदबा राहिला. तिने शरीरसौष्ठव गटात सर्वोत्तम प्रदर्शन करताना ‘मिस महाराष्ट्र’चे जेतेपद कायम राखले. महिलांच्या फिजिक स्पोर्टस् प्रकारात मुंबई उपनगरच्या दीपाली ओगलेने बाजी मारली. रेणुका मुदलियारवर मात करीत दीपालीने जेतेपद पटकावले.स्पर्धेचा निकाल (प्रथम तीन क्रमांक)५५ किलो : अवधूत निगडे (कोल्हापूर), नीतेश कोळेकर (उपनगर), नितीन शिगवण (उपनगर)६० किलो : नितीन म्हात्रे (प. ठाणे), देवचंद गावडे (मुंबई उपनगर), प्रीतेश गमरे (मुंबई उपनगर)६५ किलो : दिनेश कांबळे (ठाणे), उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), फैयाज शेख (सातारा)७० किलो : तौसिफ मोमीन, रोशन नाईक (पालघर), मनोज मोरे७५किलो : सुदर्शन खेडेकर, सतीश यादव, महेश जाधव८० किलो : अनिल बिलावा, भास्कर कांबळे, राजू भडाळे (पुणे)८५ किलो : सुशील मुरकर (मुंबई), गणेश पेडामकर, हबीब सय्यद९० किलो : रसल दिब्रिटो (मुंबई उपनगर), दीपक तांबीटकर (मुंबई), संदेश सावंत (सिंधुदुर्ग)१०० किलो वजनी गट : महेंद्र्र चव्हाण (पुणे), अरुण नेवरेकर (मुंबई), विशाल पखाले (सातारा).१०० किलोवरील : नीलेश दगडे (मुंबई उपनगर), अक्षय मोगरकर (ठाणे).

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव