शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बोल्ट, जोकोविच, मेस्सीला नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2016 4:07 AM

लॉरेस क्रीडा पुरस्कार २०१६ साठीचे नामांकन जाहीर झाले असून, क्रीडाजगतातील महान खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. १८ एप्रिलला बर्लिन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

बर्लिन : लॉरेस क्रीडा पुरस्कार २०१६ साठीचे नामांकन जाहीर झाले असून, क्रीडाजगतातील महान खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. १८ एप्रिलला बर्लिन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी तीन वेळा पुरस्कार विजेता उसेन बोल्ट, टेनिसपटू नोव्हाक जोकोविच, तीन वेळा फॉर्म्युला वन विजेता लेविस हॅमिल्टन, फुटबॉलपटू लिओनल मेस्सी यांच्यासह एनबीएचा स्टार खेळाडू स्टिफन करे व नंबर १ चा गोल्फपटू जॉर्डन स्पेथ यांना प्रथमच नामांकन मिळाले आहे. तसेच, २०१५ मध्ये तीन ग्रॅँडस्लॅम विजेती टेनिसपटू सेरेना विल्यम्सला पुन्हा एकदा नामांकन मिळाले आहे. या प्रकारात तिला दहा वेळा नामांकन मिळाले आहे. उत्कृष्ट संघासाठीच्या नामांकनामध्ये मर्सिडिस बेंझ फॉर्म्युला वन टीम, बार्सिलोना फुटबॉल क्लब, गोल्डन स्टेट वॉरियर्स, ब्रिटनचा डेव्हिस कप टेनिस संघ व तीन वेळा विश्वचषक फुटबॉल विजेता अमेरिकेचा महिला फुटबॉल संघ यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी सात विविध प्रकारांतील नामांकने जाहीर झाली असून, या प्रत्येक प्रकारात सहा जणांना नामांकन देण्यात आले आहे.