शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

‘बूस्टर जेट्स’ला हॅट्ट्रिकचा ‘संतोष’ मिळणार

By admin | Published: March 05, 2017 1:05 AM

वातावरणाची सवय नसल्याने उन्हाचा त्रास होत आहे. अंतिम दिवशी २० लॅपचे आव्हान असल्याने साहजिकच उन्हामुळे आम्हां सर्वांच्या कामगिरीवर फरक पडेल.

मुंबई : वातावरणाची सवय नसल्याने उन्हाचा त्रास होत आहे. अंतिम दिवशी २० लॅपचे आव्हान असल्याने साहजिकच उन्हामुळे आम्हां सर्वांच्या कामगिरीवर फरक पडेल. उलट सी.एस.संतोषला या वातावरणाची सवय आहे. संतोषच्या कामगिरीचा संघाला फायदा होईल, असे मत बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी कोलमन जोडीने व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही दिवशी अग्रस्थान मिळवणाऱ्या बूस्टर जेट्स संघाला अंतिम दिवशी हॅट्ट्रिकचा ‘संतोष’ मिळणार का? याकडे मुंबईकरांचे लक्ष राहणार आहे.शनिवारी पार पडलेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही अपेक्षेप्रमाणे बूस्टर कोलमन जोडीने अव्वल स्थान कायम राखले आहे. पी-वन पॉवरबोट रेसिंग स्पर्धेत जेट्स संघाने शुक्रवारच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. नेव्हिगेटर (दिशादर्शक) डेसीच्या योग्य मार्गदर्शनामुळे पायलट (चालक) सॅम कोलमन जोडीचे दुसऱ्या दिवशीही वर्चस्व दिसून आले. स्पर्धेत १५ लॅप ३७:४२:३८ मिनिटांत पूर्ण केले. (क्रीडा प्रतिनिधी)‘काँटे-की-टक्कर’ अन् बोट उलटली१स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुसरे स्थान मिळवण्यासाठी मर्लिन्स संघाचे (बोट क्रमांक-९९) जेम्स नॉर्विल व ख्रिस्तीयन पार्सन्स-यंग आणि मावेरिक्स संघाचे जॉन डोन्नेली व केविन बुरडॉक (बोट क्रमांक-९५) यांच्यात ‘काँटे-कि-टक्कर’ झाली. अन्य पॉवरबोटमुळे तयार झालेल्या लाटा, लाटांमुळे मुसंडी मारणारी वेगवान बोट यावर नियंत्रण मिळवत दुसरे स्थान मिळवण्यासाठी सुरु असलेल्या स्पर्धेच्या थराराचा मुंबईकरांनी यथेच्छ आनंद लुटला. २मात्र रेस ट्रॅकवर ७ व्या लॅपनंतर डॉल्फिन संघाने पॉवर बोटवर नियंत्रण मिळवत वेगवान आगेकूच केली. १४ व्या लॅपमध्ये शेवटच्या उजव्या वळणावर वळण घेत असताना नियंत्रण सुटल्यामुळे मावेरिक्स संघाची बोट उलटली. मात्र तात्काळ जीवरक्षक आल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. परिणामी स्पर्धा पूर्ण न करताच त्यांना परतावे लागले. - तर अवघ्या २:२६:०४ मिनिटांत सर्वात जलद लॅप पूर्ण करण्याचा देखीन मान जेट्सच्या कोलमन जोडीने मिळवला. स्पर्धेत ५९ गुणांची कमाई करत बूस्टर जेट्सने अव्वल स्थान कायम राखले आहे.- देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सी.एस.संतोष आणि गौरव गिल स्पर्धेत आपली छाप पाडण्यास अपयशी ठरत आहे. परिणामी शानदार कामगिरीने स्पर्धेचा शेवट ‘गोड’ करण्याचा निर्धार या भारतीय खेळाडूंनी व्यक्त केला आहे. - बूस्टर जेट्स संघाच्या संतोष व मार्टिन्स रॉबिनसन् जोडीने सर्वोत्तम २:३२:३२ मिनिटांची वेळ नोंदवत नवव्या स्थानावर स्पर्धा पूर्ण केली. शार्क संघाच्या गौरव गिल व जॉर्ज इवेने सर्वोत्तम २:३०:२१ मिनिटांची वेळ नोंदवत स्पर्धा सहाव्या स्थानी पूर्ण केली. रेसिंग संघाच्या फ्रँक सिल्वा व टोनी लनॉटो जोडीच्या (बोट क्रमांक-२५) बोटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही जोडी स्पर्धेत सहभागी झाली नाही. दुसऱ्या दिवस अखेर संघाची गुणतालिकासंघाचे नाव बोट एकत्रित क्रमांकगुणबूस्टर जेट्स १००-१५०५९डॉल्फिन्स११-२१५७मार्लिन्स ९९-९९९५२शार्कस्१०-२०४१मावेरिक्स९५-९८३३७रेसिंग१४-२५१९