शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

अर्जुन पुरस्कारासाठी बोपन्नाची शिफारस

By admin | Published: June 10, 2017 4:43 AM

रोहण बोपन्नाच्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला ‘हॅट्सअप’ करीत अ.भा. टेनिस महासंघाने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी

नवी दिल्ली : रोहण बोपन्नाच्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला ‘हॅट्सअप’ करीत अ.भा. टेनिस महासंघाने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्याच नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. बोपन्नाने काल कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की हिच्या सोबतीने फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकविले होते. एआयटीएचे सचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले,‘आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी बोपन्नाच्या नावाची आधीही अनेकदा शिफारस केली होती पण मागच्या समितीने त्याला पुरस्कार दिला नाही. आता तो या पुरस्काराचा हकदार आहे. यंदा त्याला अर्जुन मिळायलाच हवा. बोपन्नासह रश्मी चक्रवर्ती हिच्या नावाची देखील आम्ही शिफारस केली आहे.’ अर्ज पाठविण्याची तारीख संपली आहे, असे स्मरण करून देताच चॅटर्जी म्हणाले,‘आम्ही आजच नाव पाठविण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष बाब म्हणून नाव पाठविता येते.’ लियांडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकणारा बोपन्ना चौथा भारतीय टेनिसपटू ठरला. एआयटीएने या जेतेपदाबद्दल बोपन्नाची पाठ थोपटताना म्हटले की बोपन्ना जेतेपदाचा हकदार होताच. भविष्यात आणखी विजेतेपद मिळविण्यासाठी त्याला शुभेच्छा. युवा आणि प्रतिभावान खेळाडूंसाठी प्रेरणादायी कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)