शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

ब्राव्होने दिली टीम इंडियाला मेजवानी

By admin | Published: June 27, 2017 12:49 AM

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संबंध अधिक सलोख्याचे आहेत. आयपीएलच्या सत्रात अनेकदा त्याची प्रचिती आली आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि भारतीय खेळाडू यांच्यातील संबंध अधिक सलोख्याचे आहेत. आयपीएलच्या सत्रात अनेकदा त्याची प्रचिती आली आहे. सध्या पुन्हा एकदा त्याची अनुभूती येताना दिसते. फक्त यावेळी ठिकाण वेगळे आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील मोकळ्या वेळेत भारतीय क्रि केटर्सना ब्राव्होने त्याच्या घरी मेजवानी दिली. ब्राव्होच्या घरी मेजवानीला गेल्याचा फोटो भारतीय सलामीवीर शिखर धवनने टिष्ट्वटरवर शेअर केले आहेत. धवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासोबत ब्राव्होदेखील दिसत आहे. टी-२० विश्वचषकानंतर ब्राव्हो चॅम्पियन्स या गाण्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता.शिखर धवनशिवाय ब्राव्होने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनदेखील भारतीय संघातील खेळाडूंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि भुवनेश्वर कुमार दिसत आहेत. एका फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी, धोनीची छोटी मुलगी झीवा याच्यासोबत ब्राव्होची आईदेखील दिसते. या फोटोला ब्राव्होने कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, ‘रविवारी रात्री माझा भाऊ महेंद्रसिंग धोनी, त्याची मुलगी आणि माझी आई आम्ही एकत्र माझ्या घरात होतो. हा क्षण खूपच आनंददायी होता.’ भुवनेश्वरसोबतच्या फोटोला कॅप्शन देताना ब्राव्होने आयपीएलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयपीएलच्या सत्रात दोनवेळा ‘पर्पल कॅप’चे मानकरी ठरल्याचा उल्लेख त्याने कॅप्शनमध्ये केला.काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ब्राव्हो, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व युवा भारतीय खेळाडूंसोबत दिसला होता. भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाल्यानंतर धोनी आणि संघाचे स्वागत करण्यासाठी ब्राव्होने टिष्ट्वटदेखील केले. ब्राव्हो धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसला. तसेच यंदाच्या आयपीएल सत्रात तो सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. (वृत्तसंस्था)