साओपावलो : नेमारने शुक्रवारी तीनवेळा विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू दिवंगत पेले यांना मागे टाकून ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल नोंदविणारा फुटबॉलपटू होण्याचा मान मिळविला. नेमारने ही कामगिरी बोलेव्हिया विरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात ६१व्या मिनिटाला गोल नोंदवून केली. अमेजन शहरातील बेलेम येथे ३१ वर्षांच्या नेमारने ७८ वा गोल केला. त्यामुळे पेले यांचा ७७ गोलचा विक्रम त्याने मोडीत काढला. ब्राझीलने हा सामना ५-१ असा जिंकला.
नेमारने संघासाठी चौथा आणि पाचवा गोल केला. आता त्याचे ७९ गोल झाले आहेत. अल हिलालचा हा स्ट्रायकर १७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल नोंदविण्यात अपयशी ठरला होता. दरम्यान, मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये महान खेळाडू पेले यांचे निधन झाले.त्यांनी ब्राझीलसाठी ९२ सामन्यांत ७७ गोल नोंदविले आहेत.