गोवा : इन्चॉन (दक्षिण कोरिया) येथे सुरु झालेल्या कोरिया ओपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी सज्ज झाल्या आहेत. मंगळवारी या खेळाडूंनी एकत्र सराव केला. सायना-सिंधू ही जोडी सराव करताना पाहून अनेकांना आश्चर्य झाला. कारण या दोघांतील दुहेरीतील तालमेळ उत्कृष्ट होता. दुसऱ्या बाजूने पी. कश्यप आणि साई प्रणिथ ही जोडी होती.
सायनाने बॅडमिंटन या खेळाला भारतामध्ये ग्लॅमर मिळवून दिले. बॅडमिंटनमधील ऑलिम्पिक पदक सायनाने देशाला मिळवून दिले. लंडन ऑलिम्पकमध्ये सायनाला कांस्यपदक मिळवले होते. पण त्यानंतर काही वर्षांमध्ये सायनाचा फॉर्म चांगला राहीला नाही. सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांच्याबरोबर भांडणही झाल्याचे म्हटले गेले. त्यानंतर सिंधूचा उदय झाला. गोपिचंद यांची शिष्या असलेल्या सिंधूने सायनापेक्षा जास्त यश मिळवले. ऑलिम्पकमध्ये सायनाने कांस्य जिंकले होते, तर सिंधीने रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर अन्य जागतिक स्पर्धांमध्येही सिंधू सायनापेक्षा चांगली कामगिरी केली.
सिंधूचा कामगिरीचा, जाहीरातींचा आणि प्रसिद्धीचा आलेख चढता होत राहीला. त्यानंतर सायना आणि सिंधू यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचेही म्हटले गेले. पण आज अखेर या दोघींनी एकत्र येऊन सराव केला आणि त्यामुळेच चाहत्यांना मोठा धक्का बसला.