मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात 20 जुलैला सलामीचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. पहिल्याच दिवशी सध्याच विजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
मागील हंगामात सर्वांचे लक्ष वेधणारा मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल. राहुल चौधरी हा तमीळ थलायव्हाज संघात अजय ठाकूरसोबत खेळणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कॅप्टन कुल अनुप कुमार आणि राकेश कुमार यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील. हे अनुक्रमे पुणेरी पलटन व हरयाणा स्टीलर्स यांचा सामना करतील.
यंदाची लीग ही साखळी फेरीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल, तर मंगळवार हा विश्रांतीचा दिवस असणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्यापूर्वी संघाला चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे.
हैदराबाद टप्पा - 20 ते 26 जुलैमुंबई टप्पा - 27 जुलै ते 2 ऑगस्टपाटणा टप्पा - 3 ते 9 ऑगस्ट