जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं खेळाडूला मोठा धक्का दिला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 11 लाख 20,106 रुग्ण आढळले आहेत. त्यापेली 59,257 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 2 लाख 29,853 रुग्ण बरे झाले आहेत. पण, कोरोना व्हायरसमुळे एका खेळाडूवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना प्राण गमवावे लागले. वडीलांनंतर या खेळाडूच्या आजीनं शनिवारी कोरोना व्हायरसमुळे अखेरचा श्वास घेतला.
अँथोनी यार्डे असे या खेळाडूचे नाव आहे. ब्रिटीश बॉक्सर असलेल्या यार्डेनं शनिवारी आजीचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेली ही कुटुंबातील दुसरी व्यक्ती असल्याचेही त्यानं सांगितलं. गत आठवड्यात यार्डेच्या वडीलांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
28 वर्षीय यार्डेनं लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं लिहिले की,''माझ्या कुटुंबातील दोन सदस्यांना मी गमावले आहे. हा विषाणू घातकी आहे. तरीही लोकं अजूनही बाहेर फिरत आहेत. असं करण्याची गरज नाही. स्वतःच आणि इतरांचं आयुष्य धोक्यात आणू नका. घरीच राहा.''
ब्रिटनमध्ये कोरोनाचे 38168 रुग्ण आढळले आहेतआणि त्यापैकी 3605 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यार्डेनं सांगितलं की,'' वडिला तंदुरुस्त होते आणि त्यांना कोणताही आजार नव्हता.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान
Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय
Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?
इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत