शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

जखमी विकासला कांस्य

By admin | Published: June 25, 2016 2:45 AM

रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा मिळवून देणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) याला येथे आइबा विश्व क्वॉलिफार्इंग स्पर्धेत शुक्रवारी जखमी झाल्यामुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागली.

बाकू (अजरबैजान) : रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा मिळवून देणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) याला येथे आइबा विश्व क्वॉलिफार्इंग स्पर्धेत शुक्रवारी जखमी झाल्यामुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मनोज कुमार (६४ किलो) यालादेखील कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण ८१ किलो वजन गटात सुमित सांगवान (८१) याची आॅलिम्पिकला पात्र ठरण्याची आशा संपुष्टात आली. विकास आणि अन्य भारतीय बॉक्सर मनोज कुमार यांनी आपापल्या वजन गटांत गुरुवारी उपांत्य फेरी गाठतानाच रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते. त्याचबरोबर रिओसाठी पात्र ठरणाऱ्या भारतीय मुष्टियोद्ध्यांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.विकास चेहऱ्यावर जखम झाल्यामुळे उपांत्य फेरीत खेळू शकला नाही. हा भारतीय मुष्टियोद्धा उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या ली डोंगयून याच्याविरुद्ध खेळताना जखमी झाला होता. विकासने हा सामना जिंकतानाच आॅलिम्पिक कोटा मिळविला होता; परंतु चेहऱ्यावर झालेल्या जखमेमुळे त्याला टाके पडले आणि तो शुक्रवारी तुर्कमेनिस्तानच्या आचिलोव अर्सालानबेकविरुद्ध उपांत्य फेरीत खेळू शकला नाही.विकासला वैद्यकीयदृष्ट्या अनफिट घोषित करण्यात आले होते, असे भारतीय पदक अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या डोळ्यांवर टाके असून, डॉक्टरांनी त्याला उपांत्य फेरीत खेळण्यास मज्जाव केला होता.४९ किलो वजन गटात लेशराम देवेंद्रो सिंह याची लढत स्पेनच्या कारमोना हेरेडिया सॅम्युअलविरुद्ध होईल. या गटात फक्त दोन कोटा बाकी आहे. त्यामुळे त्याला पात्र होण्यासाठी जिंकणे आवश्यक आहे.८१ किलो वजन गटात सुमित सांगवान (८१) याची आॅलिम्पिकला पात्र ठरण्याची आशा संपुष्टात आली. सुमितला रशियाच्या अव्वल मानांकित पीटर खामोकोव्ह याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. रशियन बॉक्सरने सुवर्णपदक जिंकले असते तर सुमित आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला असता; परंतु खामोकव्हने उपांत्य फेरीच्या लढतीतून माघार घेतली. त्यामुळे सुमितच्या आशा संपल्या.