नूर सुलतान (कझाखस्तान) : जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच पदकाची कमाई करत भारताची आघाडीची कुस्तीगीर विनेश फोगाटने पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकिटही मिळवले. त्याचवेळी दुसरीकडे, पूजा ढांडानेही पदकाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली असून तिचे कांस्य पदक केवळ एक विजय दूर आहे. यात ती यशस्वी ठरली, तर पूजा जागतिक स्पर्धेत दोन पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरेल.याआधी तीन वेळा जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या विनेशला एकदाही पदक जिंकता आले नव्हते. मात्र, यंदा मोक्याच्या लढतीत तिने यूनानच्या मारिया प्रेवोलाराकी हिला पराभूत करत कांस्य पदकावर कब्जा केला. २५ वर्षीय विनेशला सुरुवातीला निराशाजनक खेळामुळे एक गुण गमावावा लागला. कारण यावेळी मारियाच्या चेहºयावर कट लागला होता. यानंतर विनेशने चांगल्या चाली रचल्या, मात्र मारियाने भक्कम बचाव करत विश्रांतीपर्यंत नाममात्र आघाडी घेतली. विश्रांतीनंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या विनेशने मारियाला निष्प्रभ केले. मारिया यावेळी उभ्याने डाव टाकण्याचा प्रयत्न करत होती. काहीवेळच्या झटापटीनंतर विनेशने चार गुणांची फेक करत मारियाला जमिनीवर लोळवले आणि बाजी जिंकली.जागतिक पदक जिंकणारी विनेश भारताची पाचवी महिला मल्ल ठरली. याआधी अलका तोमर (२००६), गीता फोगाट (२०१२), बबीता फोगाट (२०१२) व पूजा ढांडा (२०१८) यांनी पदक जिंकले आहेत. त्याचप्रमाणे, विनेश आता भारताच्या सर्वात यशस्वी कुस्तीगीरपैकी एक ठरली. विनेशने राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावले आहे.स्पर्धेच्या दुसºयाच फेरीत गतविजेत्या मायू मुकेदाविरुद्ध विनेशचा पराभव झाला होता. यानंतर रेपेचेजच्या पहिल्या फेरीत विनेशने यूक्रेनच्या यूलिया खालवाद्जीला ५-० असे लोळवले. (वृत्तसंस्था)।पूजाच्या विक्रमाची प्रतीक्षापूजा ढांडाकडूनही या स्पर्धेत पदकाची आशा आहे. या स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय मल्ल बनू शकते. पुरुष गटात केवळ बजरंग पुनिया यानेच या स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. पूजाने ५९ किलो गटात उपांत्य फेरी गाठली. तथापि या गटाचा समावेश आॅलिम्पिकमध्ये नाही. २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये पूजाने कांस्य पदक जिंकले होते. बुधवारी तिने जपानच्या युजुका इंगाकीला ८-७ असे नमविले.
विनेश फोगाटने मिळवले कांस्य पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:22 AM