नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या मालिकेत डीआरएस मुद्यावर क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे मत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. यंदा सुरुवातील सर्वोच्च न्यायालयातर्फे लोढा समितीच्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलेले ठाकूर म्हणाले,‘क्रिकेट आॅस्ट्रेलिया भारताच्या मुद्यावर नेहमी आपले मत लादण्याचा प्रयत्न करतो.’ठाकूर यांनी टिष्ट्वट केले,‘विराट कोहलीसारख्या महान खेळाडू प्रकरणी आॅस्ट्रेलियन मीडिया व क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांचा व्यवहार चुकीचा आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियना नेहमी क्रिकेटला आपल्या मनाप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी खेळाडूंना लक्ष्य करते.’ठाकूर पुढे म्हणाले, बीसीसीआयचा पूर्णणे भारतीय खेळाडूंना पाठिंबा नसतो. बीसीसीआयला आपल्या कर्णधाराच्या स्वाभिमानाची चिंता नाही. त्याचप्रमाणे बीसीसीआय खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे टाळते.’ (वृत्तसंस्था)
सीएच्या पदाधिकाऱ्यांनी कोहलीला लक्ष्य करणे चुकीचे : ठाकूर
By admin | Published: March 24, 2017 12:23 AM