रिओ : रिओ आॅलिम्पिक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी ‘ब’गटात भारताने कॅनडाविरुद्ध दोनदा आघाडी घेतली, पण कॅनडाने शानदार खेळ करीत लढत २-२ ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. भारत वि. कॅनडा लढतीच्या निमित्ताने वेगवान खेळ अनुभवाला मिळाला. या लढतीत भारतीय संघ सरस होता, पण कॅनडाने संघर्षपूर्ण खेळ केला. कॅनडाने लढत अनिर्णीत राखताना रिओमध्ये गुणाचे खाते उघडले. या लढतीत मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. ३३ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल नोंदवित भारताचे खाते उघडले, पण पुढच्याच मिनिटाला कॅनडातर्फे स्कॉट टपरने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवित बरोबरी साधली. ४१ व्या मिनिटाला रमणदीपने गोल नोंदवित भारताला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला कॅनडाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर स्कॉट टपरने पुन्हा गोल करून संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. उर्वरित ८ मिनिटांमध्ये उभय संघांना गोल नोंदवित आला नाही. (वृत्तसंस्था)भारतीय महिला अमेरिकेकडून पराभूतभारतीय महिला संघावर रिओ आॅलिम्पिकच्या ‘ब’ गटातील सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध ०-३ ने पराभवाची नामुष्की ओढवली. या लढतीत अमेरिका संघाने सुरुवातीपासूनच भारताविरुद्ध आपला दबदबा कायम राखला. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला बॅथ कॅथलिन हिने शानदार गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात भारतीय बचाव फळी अमेरिकेपुढे सपशेल अपयशी ठरली. एकापाठोपाठ एका आक्रमणाने भारतीय महिला संघ हैराण झाला होता.
कॅनडाने भारताला २-२ बरोबरीत रोखले
By admin | Published: August 13, 2016 2:13 AM