शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

कार्लसन पुन्हा विश्वविजेता

By admin | Published: November 24, 2014 2:44 AM

जागतिक बुद्धिबळ लढतीतला आजचा ११ वा डाव निकाली ठरला आणि कार्लसनने आनंदला पराभूत करून विश्वविजेतेपद राखण्यात यश मिळविले.

जयंत गोखले,जागतिक बुद्धिबळ लढतीतला आजचा ११ वा डाव निकाली ठरला आणि कार्लसनने आनंदला पराभूत करून विश्वविजेतेपद राखण्यात यश मिळविले. पांढरी मोहरी घेऊन खेळताना मॅग्नस कार्लसनने आनंदला ४५ व्या चालीत पराभूत करून आनंदचे आव्हान संपुष्टात आणले. तमाम भारतीयांच्या आशा आनंदच्या डावावर केंद्रीत झाल्या होत्या आणि कार्लसनच्या विजयामुळे आनंदच्या विश्वविजेतेपद मिळविण्याच्या आशा धुळीला मिळाल्या.कार्लसनच्या राजाच्या प्याद्याच्या ओपनिंगला आनंदने पुनश्च बर्लिन बचावाचा वापर करून एकप्रकारे निराशाच केली. बर्लिन बचावात काळी मोहरी घेऊन खेळणे आणि जिंकणे हे तसे अशक्य कोटीतले काम आहे. त्यात कार्लसनकडे आधीच एक गुणाची आघाडी असल्यामुळे स्पर्धेतली त्याची स्थिती आरामदायी होती. उर्वरित दोन्ही डाव बरोबरीत सोडवणे एवढेच त्याला साध्य करायचे होते. अशा वेळी आनंदने सिसिलीयन बचाव खेळून कार्लसनला थोडे अस्थिर करणे आवश्यक होते, असे अनेक जाणकारांचे मत होते. आनंदने आजच्या डावात वैविध्यपूर्ण चाली केल्या परंतु त्याची डावावर पकड कधीच प्रस्थापित होऊ शकली नाही. उलट, २० व्या चालीनंतर कार्लसनने आपली स्थिती कमालीची मजबूत करून घेतली होती. अनपेक्षितपणे २६ व्या चालीला आनंदला ु5 या चालीमुळे सुंदर प्रतिहल्ला करण्याची संधी मिळाली. आनंदच्या या अप्रतिम हल्ल्यामुळे कार्लसन गोंधळून गेलेला स्पष्टपणे दिसून येत होता. घड्याळाच्याबाबत सुद्धा या क्षणाला आनंदने कार्लसनवर आघाडी घेतली होती. दुर्दैवाने, आनंदला या आक्रमणातली धार टिकवून ठेवता आली नाही आणि पुढच्या तीन चालीतच आनंदने स्वत:च्या हत्तीचा कार्लसनच्या उंटासाठी हकनाक बळी दिला. हा डाव बघत असणाऱ्या अनेक ग्रँडमास्टर्सनी आनंदच्या या चुकीच्या योजनेचे स्पष्टीकरण देताना आनंदचे वाढलेले वय हे कारण दिले! पण आनंदपेक्षा, कार्लसनने त्या स्थितीचा जास्त खोलवर विचार केला होता हे चटकन कळून येत होते.डावाच्या अंतिम अवस्थेत तर कार्लसन म्हणजे साक्षात कर्दनकाळच असतो. त्याने ज्या सफाईने आणि झपाट्याने आनंदचा खात्मा केला ते खरोखरच अभ्यासण्यासारखे आहे. अखेर ४५व्या चालीला सर्व आशा संपुष्टात आल्याचे बघून, आनंदने डाव सोडला आणि कार्लसनला शुभेच्छा दिल्या!