जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं सर्वांचं टेंशन वाढवलं असताना ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन मधील महिला एकेरी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या कॅरोलिना मारीन हिच्या वडिलांचे रविवारी निधन झालं. गोंझालो मारिन पेरेझ असे त्यांचे नाव होते आणि फेब्रुवारी त्यांचा अपघात झाला होता आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!
स्पेनच्या बॅडमिंटन असोसिएशननं श्रद्धांजली वाहिली आहे. ''गोंझालो मारिन पेरेझ यांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. फेब्रुवारी महिन्यात अपघात झाल्यापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखाच्या काळात स्पॅनिश बॅडमिंटन असोसिएशन कॅरोलिना मारिनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,''असे असोसिएशननं ट्विट केलं.
फेब्रुवारीत ते कामावर असताना पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी मारिन ऑल इंग्लंड स्पर्धेत खेळत होती आणि तिला घरी परतावे लागले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणआ झाली नाही.
Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य
सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?
बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत