शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

कॅरम : संदिप देवरुखकर आणि संगीता चांदोरकर अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 9:15 PM

राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरने प्रिती खेडेकरची २५-१९, ११-२५, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढली.

मुंबई : द. बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनने आयोजित केलेल्या मुथूट फायनान्स पुरस्कृत प्रतिष्ठेच्या मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे ओ. एन. जी. सी.च्या बिनमानांकित संदिप देवरुखकर व माजी राज्य व राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या  संगीता चांदोरकर यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. पुरुष एकेरीच्या अंतिम  फेरीच्या एक तास दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात ओ. एन. जी. सी.च्या संदिप देवरुखकरने चौथा मानांकित जागतिक व विश्व विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेचा २५-११, २५-० असा फाडशा पाहत विजेतेपदाचा मानकरी ठरला. पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस्‌ची आतषबाजी व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत संदिप देवरुखकरने पाचव्या बोर्डपर्यंत २०-११ अशी आघाडी घेत नंतरच्या बोर्डमध्ये ५ गुण मिळवून २५-११ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये संदिप देवरुखकरने आपल्या ब्रेकमध्ये १२ चा बोर्ड मिळवून १२-० अशी अशघाडी घेतली. नंतरच्या प्रशांत मोरेच्या ब्रेकमध्ये ११ गुणांचा बोर्ड जिंकून २१-० अशी आघाडी घेतली. प्रशांत मोरेला सूर गवसला नसल्यामुळे संदिप देवरुखकरच्या ब्रेकमध्ये ४ गुण घेऊन २५-० असा दुसरा गेम जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओ. एन. जी. सी.च्या संदिप देवरुखकरने दोन गेम रंगलेल्या लढतीत बृहन्मुबई महानगरपालिकेच्या गिरीष तांबेला २५-७, २५-१५ असे निष्प्रभ करत अंतीम फेरी गाठली.  नमवून अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने तीन गेम रंगलेल्या लढतीत एअर इंडियाच्या झाहिर अहमदचा २५-१७, २५-१६ असे नमवित अंतीम फेरीत प्रवेश मिळविला. 

महिला एकेरी गटाच्या अंतीम फेरीच्या तीन तास रंगलेल्या सामन्यात माजी राज्य व राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरने दुसऱ्या मानांकित सी. डी. ए. नेव्हीच्या प्रीति खेडेकरचा २५-१९, ११-२५, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढून विजेतेपदावर नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित सी. डी. ए. नेव्हीच्या प्रीति खेडेकरने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत शिवताराच्या सुषमा परदेशीचा २५-६, २५-९ असे नमवून अंतिम फेरी गाठली. रिझर्व्ह बँकेच्या अग्रमानांकित संगीता चांदोरकरने अटीतटीच्या दोन गेम रंगलेल्या लढीत आयुर्विमा महामंडळाच्या माजी राज्य विजेती शिल्पा पलनीटकरचा २५-१८, २५-१३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण आठ ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली. या स्पर्धेमध्ये एकाच वेळी २४ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिसका कॅरम बोर्डस्‌ व अश्विन कॅरम सोंगट्या वापरण्यात आल्या.या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच श्री. जनार्धन संगम (मुंबई) व त्यांचे सहाय्यक पंच म्हणून श्री. सुनिल खेमकर यांनी उत्कृष्ट संचलन केले.

टॅग्स :Mumbaiमुंबई