मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्दमाने रिझर्व्ह बँक स्टाफ कम्युनिटी हॉल, मुंबाई सेंट्रल येथे सुरु असलेल्या ९ व्या कार्याध्यक्ष चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य सामन्यात ए के फाऊंडेशनच्या निलांश चिपळूणकरने शिवताराच्या हरीश अन्वरचा १४-२, २०-१५ असा साहज पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे उपांत्य लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजस जाधवने त्याच्याच सहकारी नीरज कांबळेवर तीन सेटमध्ये १३-१७, २०-११, १५-१० अशी मत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सेजल लोखंडेने उपांत्य फेरीत ए. पी. कॉलेजच्या अलीना महम्मद अन्सारीचा २०-०, २१-० असा धुव्वा उडवत अंतिम मजल गाठली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत एस एस ग्रुपच्या सिमरन शिंदेने ए के फाऊंडेशनच्या रुची माचीवालेवर १८-४, २१-० असा विजय मिळविला.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल
झैद अहमद ( एअर इंडिया ) वि वि राहुल सोळंकी ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-५, २५-४
पंकज पवार ( जैन इरिगेशन ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( एस एस सग्रुप )
महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) वि वि योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन )
संदीप देवरुखकर ( ओ एन जी सी ) वि वि ओमकार नेटके ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) १८-२०, २५-६, २४-७
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल
शिल्पा पळणिटकर ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) वि वि रोझिना गोदाद ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) १९-१३, १५-१२
उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) वि वि अनुपमा केदार ( बँक ऑफ इंडिया ) १८-१२, २५-११
संगीता चांदोरकर ( रिझर्व्ह बँक ) वि वि समिधा जाधव ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २५-४, २५-८