ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. आज नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुंबईने हरभजन सिंग, जसप्रीत बुमरा आणि लासिथ मलिंगाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला 8 बाद 158 धावांवरच रोखले.
तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर डेव्हिड वॉर्नर (49) आणि शिखर धवन (48) यांनी संघाला 48 धावांची सलामी दिली. मात्र हरभजन सिंगने वॉर्नरची विकेट काढल्यानंतर हैदराबादचा डाव गडगडला. दीपक हूडा (9) युवराज सिंग (5) आणि बेन कटिंगने (20) यांनी निराशा केल्याने हैदराबादला निर्धारीत 20 षटकात 8 बाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराने तीन, हरभजन सिंहने दोन तर हार्दिक पांड्या, लासिथ मलिंगा आणि मिचेल मॅक्लेनाघन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.