शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

गोव्यापुढे केरळ संघाचे आव्हान

By admin | Published: March 23, 2017 12:22 AM

देशातील प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा असलेल्या ७१ व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य लढती बांबोळी येथील जीएमसी

पणजी : देशातील प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा असलेल्या ७१ व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य लढती बांबोळी येथील जीएमसी मैदानावर उद्या (दि.२३) खेळविण्यात येतील. गोव्याचा सामना बलाढ्य केरळविरुद्ध तर पश्चिम बंगालचा सामना मिझोरामविरुद्ध होईल. हे सामने अनुक्रमे दुपारी ३ वा. आणि संध्याकाळी ७ वाजता होतील. सेमीफायनल लढतींचे वेळापत्रक जाहीर करताना बुधवारी गफलत झाली होती. आयोजकांनी हे सामने गुरुवारी आणि शुक्रवारी होतील असे जाहीर केले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. अखेर अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे स्पर्धा संचालक अनिल कामत यांनी स्थानिक आयोजकांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी दूर करीत त्यांनी वेळापत्रकात बदल करीत उपांत्य सामने गुरुवारीच होणार असल्याचे जाहीर केले. दूरदर्शनवर सामन्यांचे थेट प्रक्षेपणही दाखविण्यात येईल. दरम्यान, गोव्याची धुरा फ्रान्सिस फर्नांडिसकडे आहे. स्पर्धेत मार्कुस मास्कारेन्हासने सुद्धा शानदार प्रदर्शन केले आहे. हे दोन्ही खेळाडू गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. मेघालय संघाविरुद्ध २-१ अशी विजयी सलामी दिल्यानंतर गोव्याने बंगालविरुद्ध बरोबरी साधली होती. त्यानंतर चंदिगडविरुद्धचाही सामना अनिर्णित राखला होता. त्यानंतर माजी विजेत्या सेनादलाविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन करीत गोव्याने सेमीफायनलची जागा पक्की केली होती. हाच विजय गोव्यासाठी आत्मविश्वास उंचावून देणारा ठरला. प्रशिक्षक कोस्तायांनी खेळाडूंमध्ये मोठा बदल केला. त्यांनी चार सामन्यांत तीन गोलरक्षक बदलले. संघाच्या बचावातही बदल करण्यात आले. लेनी परेरा आणि फ्रान्सिस फर्नांडिस हे दोघेही अनफिट असल्यामुळे ते उद्याच्या सामन्यात खेळतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. असे झाल्यास त्यांची अनुपस्थिती गोव्यासाठी महागडी ठरूशकते. सेनादलविरुद्ध मिळवलेला विजय संघासाठी आत्मविश्वास उंचावणारा ठरला. उपांत्य सामन्यातही आम्ही मोठ्या उमेदीने मैदानात उतरणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)घरच्या चाहत्यापुढे खेळ करण्यासाठी आम्ही सुद्धा उत्साही आहे, असे प्रशिक्षक कोस्ता यांनी सांगितले. दुसरीकडे, केरळने उपांत्य फेरीत सरळ प्रवेश केला आहे. त्यांचा आघाडीपटू ज्योबी जस्टीन, अशरुद्दिन आणि कर्णधार उस्मान पी यांची आक्रमकता महत्त्वपूर्ण ठरली आहे. २०१२-१३ नंतर केरळ संघ प्रथम अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्साही आहे.