शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

भारताला नमवणे आव्हानात्मक

By admin | Published: September 14, 2016 5:18 AM

भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर आणि त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणात नमवणे मोठे आव्हान असेल, असे वक्तव्य १४ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने केले

नवी दिल्ली : भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर आणि त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या वातावरणात नमवणे मोठे आव्हान असेल, असे वक्तव्य १४ ग्रँडस्लॅम पटकावलेला स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने केले. वर्ल्ड ग्रुप डेव्हिस कप प्लेआॅफ सामन्याआधी नदालने आपले मत मांडले.भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी स्पेनने आपला तगडा संघ पाठवला आहे. यामध्ये ‘राफा’सह अनुभवी डेव्हिड फेररचाही समावेश आहे. स्पेनचा २० सदस्यीय संघ सोमवारी भारतात पोहोचल्यानंतर राफाने संध्याकाळी कोर्टवर कसून सराव करीत वातावरणाचा अंदाज घेतला. तसेच, फेररनेदेखील सुमारे दीड तास सराव केला.‘राफा’ने सांगितले, ‘‘येथील कोर्ट खूप चांगले आहे, परंतु वातावरण गरम आहे. मात्र, पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर आल्याने चांगले वाटत आहे.’’ या लढतीत एकीकडे बलाढ्य स्पेनला संभाव्य विजेते मानले जात असताना, दुसरीकडे यजमान भारताकडे तळाच्या स्थानावरील साकेत मिनेनी (१३७ रँकिंग) आणि रामकुमार रामनाथन (२०३) यांचा समावेश आहे. आपल्याहून अत्यंत कमी मानांकन असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविषयी राफा म्हणाला, ‘‘आमच्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असून आम्हाला वर्ल्ड ग्रुप प्लेआॅफ सामना जिंकणे अनिवार्य आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून माझ्यासाठी हीच बाब सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा आपण देशाबाहेर खेळत असतो तेव्हा प्रत्येकासाठी परिस्थिती वेगळी असते. भारतीय संघ खूप चांगला असून आम्ही त्यांच्याकडून कडव्या आव्हानाची अपेक्षा करीत आहोत. शिवाय घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांना येथील परिस्थितीचा फायदा मिळेल,’’ असेही राफा याने या वेळी सांगितले. एकूणच हा पूर्णपणे एकतर्फी सामना असल्याचे जाणकारांचे मत असल्याने, अशा परिस्थितीत स्पेनकडे गमावण्यासारखे खूप काही आहे.२०१४ मध्ये जर्मनीविरुद्ध १-४ असे पराभूत झाल्यानंतर पहिल्याच फेरीतून स्पेन संघ बाद झाला होता.या धक्क्यातूनच धडा घेताना त्यांनी या वेळी आपला मजबूत संघ उतरवला आहे.