अबुधाबी : लुईस हॅमिल्टन व निको रोसबर्ग या मर्सिडीज संघाच्या चालकांमध्येच विश्वविजेता कोण बनणार, यामध्ये चुरस अखेरपर्यंत रंगली. सत्रातील शेवटच्या अबुधाबी ग्रां. प्री. स्पर्धेतील विजेत्याच्या गळ्यात ही माळ पडणार असल्याने दोघांमध्ये रंगलेली टशन रविवारी पाहायला मिळाली. परंतु यात बाजी मारली ती लुईसने. अबुधाबी ग्रां. प्री. स्पर्धेच्या जेतेपदासह लुईसने दुसऱ्यांदा विश्वविजेत्याचा मान पटकावला. ४६ वर्षांच्या इतिहासात दोन विश्वविजेतेपद पटकावणारा लुईस हा पहिलाच ब्रिटिश खेळाडू ठरला आहे. २९ वर्षीय लुईसने २००८मध्ये मॅक्लेरेनकडून खेळताना पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावला होता. या विश्वजेतेपदासह लुईस जॅकी स्टीवर्ट, जीम क्लार्क आणि ग्रॅहम हिल यांच्या पंगतीत जाऊन बसला. १९६८मध्ये दोन जेतेपद पटकावणारा हिल हा शेवटचा खेळाडू होता. ५५ लॅप्सच्या या शर्यतीत लुईसने केवळ आघाडीच घेतली नाही, तर संघ सहकारी निको रोसबर्ग याचे आव्हानही सहज परतवले. यावर्षी ११व्यांदा पोल पोझीशनपासून सुरुवात करणाऱ्या लुईसला निकोकडून कडवे आव्हान मिळाले. मात्र, निकोच्या गाडीत बिघाड झाल्याने लुईसचा जेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. (वृत्तसंस्था)
‘चॅम्पियन’ लुईस हॅमिल्टन
By admin | Published: November 24, 2014 2:43 AM