- मेसूत ओझिलशी बातचीत...मेसूत ओझिल याने आर्सेनलसाठी या सत्रात शानदार प्रदर्शन केले. त्याने १२ गोल नोंदवले. असे असले तरी त्याचे योगदान संघासाठी कितपत फायद्याचे ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण पुढील सत्रात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेसाठी त्यांचा एक सामना शिल्लक आहे. इमिरात येथे एव्हर्टनविरुद्ध उद्या आर्सेनलला विजयासाठीच मैदानात उतरावे लागेल. आर्सेनलसाठी चांगली बातमी अशी, की एफए चषकाच्या अंतिम सामन्यात त्यांना चेल्सीविरुद्ध भिडावे लागेल. जर्मनीचा सुपरस्टार मिडफिल्डर मेसूत ओझिल हा आपल्या संघाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करेल. व्यवस्थापक वेंगर्स याचे भविष्यही उद्याच्या निकालावर बरेच अवलंबून आहे. या सामन्याबाबत ओझिल याच्यासोबत साधलेला संवाद...प्रश्न - चॅम्पियन्स लीग गाठण्यासाठी आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आर्सेनलला संधी आहे. हे तुझ्या हातात जरी नसले तरी याबाबत तू काय सांगशील?- बरेच काही. निश्चितच, चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवणे प्रत्येकासाठीमहत्त्वाचे आहे. जगातील चांगल्या क्लबपैकी एक असा आर्सेनल आहे. प्रश्न - एक खेळाडू म्हणून काय वाटते? वैयक्तिकरीत्या तुला किती महत्त्वाचे वाटते?- जसे इतर खेळाडूंना वाटत असते तसेच. एक खेळाडू म्हणून चॅम्पियन्स लीगचे महत्त्व अधिक आहे. खेळाडूपेक्षा चाहता म्हणून ही स्पर्धा खास आहे. त्यामुळे आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे. प्रश्न : गेल्या ४ वर्षांपासून तू चॅम्पियन्स लीगमध्येआर्सेनलकडून खेळत आहेस, तुला संघाच्या ताकदीबाबत काय वाटते?- आमचे मोठे ध्येय आहे. ते अजून संपलेले नाही. आर्सेनल महान क्लब आहे. ते त्या पात्रतेचेही आहेत म्हणून खूप मेहनत घेत आहोत.प्रश्न - आर्सेनल जर पात्र ठरू शकला नाही तर तू दुसरीकडे जाण्याचा विचार करीत आहेस काय? कारण तुझा नवीन करार अजून झालेला नाही. याबद्दल काय सांंगशील?- मी तसा विचार करीत नाही. चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवणे हेच माझ्यासाठी प्राधान्यक्रमाचे आहे. सर्व एकत्र मिळून नंतर भविष्याचा विचार करू. प्रश्न - आर्सेनलकडून तू आतापर्यंत खूश आहेस?निश्चितच, गेल्या चार वर्षांपासून मी येथे खेळत आहे. एका कुटुंबाकडून खेळल्यासारखे वाटते. खूप सोयीचा असा हा क्लब आहे. सध्या आम्ही एक टीम म्हणून खेळत आहोत, ते महत्त्वाचे आहे. आमच्यापुढे चांगले ध्येय आहे. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या चारमध्ये येण्याचे आमचा प्रयत्न आहे. प्रश्न - तुझ्यावर टीकाही केली जात आहे. तू संघासाठी मेहनत घेत नाहीस असेही म्हटले जात आहे. हे तुला दुखावणारे नाही?- करिअरच्या सुरुवातीला तसे वाटायचे. कारण मला अनुभव नव्हता. पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करतो. लोक काय म्हणतील हे महत्त्वाचे नाही. कोच काय सांगतो ते महत्त्वाचे आहे. लोक म्हणतात ते सर्वच बरोबर असते असे नाही.
चॅम्पियन्स लीग पात्रता हेच प्राधान्य
By admin | Published: May 21, 2017 1:23 AM