नवी दिल्ली : नुकत्याच दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या जागतिक विद्यापीठीय क्रीडास्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत सहभागी न होण्याच्या निर्णयाचा निशाणेबाज अपूर्वी चंदेला हिने बचाव करताना स्पर्धा अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. याबाबत चंदेलाने सांगितले, की अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देताना अशा स्पर्धेत सहभाग घेण्यास सांगितले, ज्यासाठी माझ्याकडे साहित्यही नव्हते.चंदेलाने सांगितले, की या स्पर्धेच्या दोन आठवड्यांपूर्वी मला प्रोन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत सांगितले होते, ज्यासाठी मी सहमती दर्शवली. मात्र, तेथे गेल्यावर कळविण्यात आले, की मला थ्री पोझिशन स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, ज्यासाठी माझ्याकडे साहित्यदेखील नव्हते. यानंतर २ स्पर्धांत चंदेला सहभागी झाली व लगेच भारतात परतली होती. याविषयी तिने सांगितले, की थ्री पोझिशन प्रकाराचा सरावदेखील केला नसल्याने मी अधिकाऱ्यांना या स्पर्धेत खेळणार नसल्याचे कळविले. तसेच, स्पर्धेत एअर रायफल व प्रोनमध्ये सहभाग घेऊन भारतात परतले. कारण मला आगामी विश्वचषक स्पर्धेची तयारी करायची होती.’’ (वृत्तसंस्था)
चंदेलाने अधिकाऱ्यांना धरले जबाबदार
By admin | Published: July 17, 2015 3:26 AM