शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

स्पर्धेचे बदललेले स्वरुप भारतासाठी चांगले

By admin | Published: July 22, 2016 8:08 PM

रिओ आॅलिम्पिकमध्ये बदलण्यात आलेले स्पर्धेचे स्वरुप भारतासह छोट्या संघांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. थेट उपांत्य फेरी ऐवजी उपांत्यपुर्व फेरी होणार असल्याने प्रत्येक संघाला

ओल्टमन्स यांचा विश्वास : रिओ स्पर्धेनिमित्ताने पहिल्यांदाच बदल

बंगळुरु : रिओ आॅलिम्पिकमध्ये बदलण्यात आलेले स्पर्धेचे स्वरुप भारतासह छोट्या संघांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. थेट उपांत्य फेरी ऐवजी उपांत्यपुर्व फेरी होणार असल्याने प्रत्येक संघाला आगेकूच करण्याची समान संधी मिळेल, असे वक्तव्य भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी केले.येथील ‘साई सेंटर’मध्ये बोलताना ओल्टमन्स म्हणाले की, ‘‘जर गटामध्ये अर्जेंटीना, जर्मनी आणि हॉलंड सारखे बलाढ्य संघ असतील, तर अव्वल दोन संघांमध्ये जागा निश्चित करणे खूप कठीण बनते. आगेकूच करणे अशक्य नसते, मात्र जर तुम्ही अव्वल चार संघांमध्ये असाल तर उपांत्यपुर्व फेरीत खेळू शकता. यामुळे भारतासह इतर संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी आत्मविश्वास मिळेल.’’आॅलिम्पिक सुरु होण्याच्या काही दिवसआधीच हॉकी इंडियाने अनुभवी सरदार सिंगच्या जागी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची कर्णधार म्हणून निवड केली. याविषयी सरदारवरील दडपण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगताना ओल्टमन्स म्हणाले की, ‘‘सध्य संघ जबरदस्त समतोल बनला आहे. त्यामुळेच सरदार आपल्या खेळावर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करु शकतो. इतर खेळाडूंनाही संधी मिळावी हेच आमचे ध्येय होते.’’  ‘‘सरदार, एस. व्ही. सुनील, व्ही. आर. रघुनाथन, मनप्रीत सिंग आणि श्रीजेश हे अनुभवी खेळाडू मिळून कर्णधारांचा समूह तयार करतील. त्यामुळेच हे एक सकारात्मक पाऊल आहे,’’ असेही ओल्टमन्स यांनी सांगितले. दखल घेण्याची बाब म्हणजे रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघात लंडन आॅलिम्पिक खेळलेले एकूण ७ खेळाडूंचा समावेश आहे. तर तब्बल नऊ खेळाडू पहिल्यांदाच आॅलिम्पिक खेळतील. त्याचवेळी अनुभवी बचावपटू बीरेंद्र लाकडा याची कमी भारतीय संघाला भासू शकते. अजूनही लाकड गुडघ्याच्या दुखापतीतून सावरु शकला नाही. (वृत्तसंस्था)लाकडाने रिओ आॅलिम्पिक खेळावे ही माझी इच्छा होती, मात्र हे शक्य नव्हते. तो भारताचा सर्वोत्तम संरक्षकापैकी एक आहे. परंतु, केवळ एकाच खेळाडूवर अवलंबून राहता येणार नाही. आम्ही अझलन शाह कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा लाकडाच्या अनुपस्थितीमध्ये खेळलो. विशेष म्हणजे त्याच्याजागी खेळणाºयांनी चांगली कामगिरी केली आहे.- रोलंड ओल्टमन्स रिओ आॅलिम्पिकमच्या निमित्ताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने स्पर्धेचे स्वरुप बदलले आहे. एकूण १२ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी ६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ आपल्या गटात राऊंड रॉबिनपध्दतीने सामने खेळतील. यानंतर दोन्ही गटातील अव्वल चार संघ उपांत्यपुर्व फेरीसाठी पात्र ठरतील.