शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारत ‘अ’ला आव्हान २८३ धावांचे आव्हान

By admin | Published: January 12, 2017 2:56 PM

भारत अच्या युवा खेळाडूंनी नियंत्रित मारा करताना इंग्लंड इलेव्हनला दुसऱ्या सराव सामन्यात २८२ धावांवर रोखले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.  : भारत अ च्या युवा खेळाडूंनी नियंत्रित मारा करताना इंग्लंड इलेव्हनला दुस-या सराव सामन्यात २८२ धावांवर रोखले. मंगळवारी झालेल्या पहिल्या सराव सराव सामन्याच्या तुलनेत भारतीय संघात यावेळी युवा व अननुभवी खेळाडूंचा भरणा अधिक होता. तरीही, त्यांनी नियंत्रित मारा करुन इंग्लंडला तीनशेचा पल्ला मारु देण्यापासून रोखले. मात्र, इंग्लंडची ९ बाद २११ अशी अवस्था केल्यानंतरही गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारत अ ला आव्हानात्मक धावसंख्येला सामोरे जावे लागेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंड कर्णधार इआॅन मॉर्गनने सलग दुस-यांदा नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉय - अ‍ॅलेक्स हेल्स यांनी आक्रमक सुरुवात करताना भारतीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रदीप सांगवानच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर नियंत्रण गमावलेला रॉय हिट विकेट झाल्याने भारतीयांना पहिले यश मिळाले. यानंतर हेल्स - जॉनी बेयरस्टॉ यांनी ७४ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला मजबूत स्थितीमध्ये आणले. फिरकीपटू शाहबाझ नदीमने हेल्सला बाद करुन ही जोडी फोडली. हेल्सने ५३ चेंडूत ८ चौकारांसह ५१ धावा काढल्या. कर्णधार इआॅन मॉर्गन पहिल्याच चेंडूवर नदीमच्या चेंडूवर झेलबाद झाला.

काहीवेळ बेयरस्टॉ - बेन स्टोक्स यांनी तग धरला. परंतु, बेयरस्टॉ आणि मोईन अली (१) पाठोपाठ बाद झाल्याने इंग्लंडचा डाव २ बाद ११६ वरुन ६ बाद १६५ असा घसरला. परवेझ रसूलने इंग्लंडची मधली फळी कापून काढताना महत्वपुर्ण 3 बळी घेतले. बेयरस्टोने ६५ चेंडूत १० चौकारांसह ६४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर भारतीयांनी ठराविक अंतराने बळी घेत इंग्लंडची ३९व्या षटकात ९ बाद २११ अशी अवस्था केली. परंतु, आदिल रशिद - डेव्हीड विली या अखेरच्या जोडीने संयमी फलंदाजी करताना निर्णयक ७१ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला आव्हानात्मक मजल मारुन देण्यात यश मिळवून दिले. ४९व्या षटकात सांगवानने रशिदला बाद करुन इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. रशिदने ४२ चेंडूत ४ चौकारांसह ३९ धावा काढल्या. तर, विली ३० चेंडूत २ चौकार व २ षटकार मारुन ३८ धावंवर नाबाद राहिला. भारत अ कडून परवेझ रसूलने ३८ धावांत ३ बळी घेतले. त्याचप्रमाणे, प्रदीप सांगवान, अशोक दिंडा आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी २ बळी घेत इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.

धावफलक : इंग्लंड : जेसन रॉय हिटविकेट गो. सांगवान २५, अ‍ॅलेक्स हेल्स झे.रहाणे गो. नदीम ५१, जॉनी बेयरस्टो झे. पंत गो. दिंडा ६४, इआॅन मॉर्गन झे. व गो. नदीम ०, बेन स्टोक्स झे. किशन गो. रसूल ३८, जोस बटलर झे. व गो. रसूल ०, मोईन अली झे. पंत गो. दिंडा १, ख्रिस वोक्स त्रि. गो. रसूल १६, आदिल रशिद झे. पंत गो. सांगवान ३९, लियाम प्लंकेट झे. पंत गो. कौल ८, डेव्हीड विली नाबाद ३८. अवांतर - २. एकूण : ४८.५ षटकात सर्वबाद २८२ धावा. गोलंदाजी : प्रदीप सांगवान ६.५-०-६४-२; सिध्दार्थ कौल ६-०-३१-१; अशोक दिंडा ८-१-५५-२; शाहबाझ नदीम १०-०-४१-२; आर. विनय कुमार ७-१-४७-०; परवेझ रसूल १०-१-३८-३; दीपक हुड्डा १-०-६-०.

 ती गर्दी धोनीसाठीच....

मंगळवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवरच झालेल्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान मुंबईकरांची तुफान गर्दी झाली होती. मात्र, दुस-या सराव सामन्यात त्यातुलनेत प्रेक्षकांची उपस्थिती होती. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे नेतृत्व पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती हे यावेळी स्पष्ट झाले. पहिल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये रंगलेली चढाओढ दुस-या सामन्यादरम्यान पहायला मिळाली नाही. मात्र, दुसºया डावात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारत अ ची फलंदाजी सुरु झाल्यानंतर मात्र, स्टेडियममध्ये हळूहळू गर्दी वाढू लागली.