ईपील : मँचेस्टर सिटी आणि साउथअॅम्टन यांच्यात चुरस
केदार लेले ल्ल लंडन
इंग्लिश प्रीमियर लीग’मध्ये शनिवारी (29 नोव्हेंबर) अव्वलस्थानी असलेला चेल्सी संघ संडरलँड संघाशी दोन हात करेल. गेल्या पाच सामन्यांत आपली विजयी घोडदौड कायम ठेवणारा न्यूकॅसलचा संघ वेस्ट हॅम विरुद्ध खेळणार आहे. अन्य सामन्यांमध्ये मँचेस्टर युनायटेड आणि हल सिटी, वेस्ट ब्रॉम आणि आर्सनल, लिव्हरपूल आणि स्टोक सिटी, स्वान्सी सिटी आणि क्रिस्टल पॅलेस हे संघ आमने-सामने येतील.
शनिवारी गुणतक्त्यातील तळागाळातील संघांच्या लढती रंगतील. त्या म्हणजे बर्नली विरुद्ध अॅस्टन व्हिला आणि क्युपीआर विरुद्ध लेस्टर सिटी.
रविवार (3क् नोव्हेंबर) दोन महत्त्वपूर्ण लढती होणार आहेत. मँचेस्टर सिटी आणि साउथअॅम्टन; तसेच टोटनम आणि एव्हर्टन यांच्यात त्याच दिवशी रंगतदार लढत होणार आहेत.
चला तर या वीकेंडला होणा:या महत्त्वपूर्ण लढतींवर टाकू यात एक धावती नजर. तसेच, यंदाच्या हंगामात या संघांच्या कामगिरीतून समोर आलेल्या आकडेवारींचा आणि विविध पैलूंचा आढावा घेऊ यात.
चेल्सी, युनायटेड आणि आर्सनल यांना गुण कमावण्याची नामी संधी
गेल्या शनिवारी एकमेकांसमोर उभे ठाकलेले मँचेस्टर युनायटेड आणि आर्सनल संघ या शनिवारी अनुक्रमे काहीसे कमकुवत संघ हल सिटी आणि वेस्ट ब्रॉम यांच्याशी भिडतील. युनायटेड आणि आर्सनल संघांना गुण कमावण्याची नामी संधी चालून आली आहे. तसेच, संडरलँड संघाविरुद्ध चेल्सीला पण तीन गुण वसूल करता येतील.
तळागाळातील संघांच्या लढती!
तळागाळातील संघांच्या लढती रंगतील त्या म्हणजे बर्नली विरुद्ध अॅस्टन व्हिला आणि क्युपीआर विरुद्ध लेस्टर सिटी.
बर्नली विरुद्ध अॅस्टन व्हिला
गेल्या आठ सामन्यांत अॅस्टन व्हिला संघाला विजय मिळवता आलेला नाही. हल्लीच क्युपीआर संघाने अॅस्टन व्हिला विरुद्ध विजय मिळवला होता. अॅस्टन व्हिला संघ बरोबरीसाठी प्रय} करेल; पण क्युपीआरप्रमाणो अगदी तोच
कित्ता गिरवण्यासाठी बर्नलीचा उत्सुक असेल!
दुस:या स्थानासाठी मँचेस्टर सिटी आणि साउथअॅम्टन यांच्यात चुरस
मँचेस्टर सिटी आणि साउथअॅम्टन यांच्यात दुस:या स्थानासाठी चुरस यंदाच्या हंगामात एकही पराभव न चाखलेल्या चेल्सी संघाने गुणतक्त्यात निर्विवाद अव्वल स्थान पटकावले आहे; पण दुस:या क्रमांकासाठी मँचेस्टर सिटी आणि साउथअॅम्टन यांच्यात चुरस दिसून येत आहे.
गेल्या सहा सामन्यांत एकमेव पराभवास सामोरे गेलेल्या साउथअॅम्टन संघ दुस:या स्थानावर विराजमान झाला आहे. असे होताना त्यांनी सर्वच फुटबॉल पंडितांना आश्चर्यचकित केले आहे. दुसरे स्थान अबाधित राखण्यासाठी साउथअॅम्टनला सिटी विरुद्ध विजय आवश्यक आहे.
इंग्लिश प्रीमियर आणि चॅम्पियन्स लीग या दोन्ही स्पर्धांमध्ये खराब सुरुवातीनंतर मँचेस्टर सिटीचे मनोधैर्य खच्ची झाले होते. पण, मंगळवारी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बलाढय़ बायर्न म्युनिक संघावर मिळवलेल्या रोमहर्षक विजयामुळे मँचेस्टर सिटीचे मनोधैर्य नक्कीच उंचावर असेल!
चेल्सीची आघाडी कमी करण्यासाठी गतविजेता सिटीसाठी आता प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी या सामन्यात त्यांना साउथअॅम्टनवर विजय नोंदवणो गरजेचे आहे. रविवारी एव्हर्टन आणि टोटनम यांच्यातील लढतीप्रमाणोच या दोन्ही संघांना विजय आवश्यक असणारी. ही लढत फुटबॉलप्रेमींसाठी नजराणा ठरू शकेल!
क्युपीआर विरुद्ध लेस्टर सिटी
क्युपीआर संघाने गेल्या 21 सामन्यांमध्ये 19वेळा पराभव चाखला आहे; तर गेल्या
6 सामन्यांत लेस्टर सिटीला एकतर बरोबरी, नाही तर पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले आहे. तसेच, गेल्या पाच सामन्यांत लेस्टर सिटीला एकही गोल करता आलेला नाही. ही निश्चितच त्यांच्यासाठी चिंतेची
बाब आहे!
एव्हर्टन
आणि टोटनम
यांच्यात चुरस
अनुक्रमे 9व्या आणि 1क्व्या स्थानावर असणा:या एव्हर्टन (17 गुण) आणि टोटनम (17 गुण) यांच्यातसुद्धा चुरस दिसून येत आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे तिकीट मिळण्यासाठी या दोन्ही संघांना समान संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोनं करण्यासाठी या दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे.
न्यूकॅसलची विजयी घोडदौड रोखली जाणार?
गेल्या पाच सामन्यांत आपली विजयी घोडदौड कायम ठेवणारा न्यूकॅसलचा संघ वेस्ट हॅम विरुद्ध खेळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तळागाळात गेलेल्या न्यूकॅसल संघाने जणू फिनिक्स भरारी घेत गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर ङोप घेतली आहे!