शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

चेन्नई ‘हसी’, आरसीबी ‘फसी’

By admin | Published: May 23, 2015 1:16 AM

धोनीच्या समयोचित धीरोदात्त फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला ३ गडी राखून हरवून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

फायनलमध्ये ‘सुपर‘ एंट्री : आशिष नेहराचा भेदक मारारांची : गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर आॅस्ट्रेलियन सलामीवीर माईक हसीची ‘हसीन’ खेळी, आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या समयोचित धीरोदात्त फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला ३ गडी राखून हरवून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रांची येथे झालेल्या क्वालिफायर-२ सामन्यात तीन महत्त्वपूर्ण बळी घेणाऱ्या आशिष नेहराला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जची अंतिम लढत आता रविवारी मुुंबई इंडियन्स संघाशी कोलकातामध्ये होणार आहे. चेन्नईचा संघ सहाव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे.प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला १३९ अशा माफक धावांवर रोखल्यानंतर ही धावसंख्या चेन्नईची तगडी बॅटींग लाईनअप सहज पार करेल असे वाटत होते, परंतु आरसीबीच्या गोलंदाजांनी त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी झुंजवले. शेवटच्या षटकांत विजयासाठी १ धाव हवी असताना धोनी बाद झाला, पण अश्विनने लाखमोलाची एकेरी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. माईक हसीने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिध्द करताना ५६ धावांची शानदार खेळी केली. त्याने स्मिथ (१७) बरोबर २१ धावांची, ड्युफ्लेसिस (२१) सोबत ४0 आणि धोनी (२६) बरोबर ४७ धावांच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या करुन संघाची धावसंख्या वाढवत नेली. पण महत्त्वाच्या क्षणी हसी बाद झाला. डेव्हीड विसेने त्याला पटेलकरवी झेलबाद केले. हसीने ४६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारासह ५६ धावा केल्या. हसी नंतर नेगी (१२), ब्राव्हो (0) हे पाठोपाठ बाद झाल्याने दडपण वाढले. पण धोनीने संयमाने खेळी करीत धावसंख्या बरोबरीत आणून ठेवली आणि तो बाद झाला. दोन चेंडूत एका धावेची गरज असताना अश्विनने आपली जबाबदारी पार पाडली अन चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आयपीएलच्या फायनलचे दार उघडले. आरसीबीला ‘सुपर’ ब्रेकच्प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलने पहिल्या षटकात आशिष नेहराला षटकार ठोकला. नेहराच्या पुढच्या षटकांत विराटने पहिल्यांदा चौकार आणि षटकार खेचला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने विराटला आपला ‘बकरा’ बनविले तर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ए. बी. डिव्हिलियर्सला तंबूत धाडले. च्गेल्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी केलेला मनदीपसिंगला चमक दाखवता आली नाही. अश्विनच्या चेंडूवर मनदीपचा अप्रतिम झेल हसीने पुढे झेपावून घेतला. त्याने ४ धावा केल्या. यावेळी आरसीबीची धावसंख्या ३ बाद ३६ अशी कुमकुवत बनली होती. दुसऱ्या बाजूला गेलला सावध भूमिका घ्यावी लागली.च्गेलने ४३ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह सर्वाधिक ४१ धावा काढल्या. दिनेश कार्तिक (२८), सरफराज खान (३१) आणि अखेरच्या क्षणी डेव्हीड वीसने (१२) केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीला समाधानकारक मजल मारता आली. चेन्नईकडून नेहराने ३ तर अश्विन, शर्मा, रैना व ब्रावो यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुगेल झे. गो. रैना ४१, विराट कोहली झे. शर्मा गो. नेहरा १२, ए.बी. डिव्हीलियर्स पायचित १, मनदीप सिंग झे. हस्सी गो. नेहरा २८, दिनेश कार्तिक झे. शर्मा गो. नेहरा, सर्फराज खान झे. नेगी गो. ब्राव्हो ३१, व्हेसे झे. ब्राव्हो गो. शर्मा १२, पटेल धावचित (धोनी) २, स्टार्क नाबाद २, अरविंद नाबाद ०. अवांतर ७, एकूण २० षटकांत ८ बाद १३९. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२८-३, आर. अश्विन ४-०-१३-१, मोहित शर्मा ४-०-२२-१ सुरेश रैना ३-०-३६-१, ब्राव्हो ३-०-२१-१ नेगी १-०-४-०, रविंद्र जडेजा १-०-१३-०.चेन्नई सुपर किंग्जड्वेन स्मिथ झे. स्टार्क गो. अरविंद १७, माईक हसी झे. पटेल गो. वीस ५६, फाफ डू प्लेसिस त्रि. गो. चहल २१, सुरेश रैना झे. वीस गो. चहल ०, महेंद्रसिंग धोनी झे. कार्तिक गो. पटेल २६, पवन नेगी धावबाद (खान) १२, ड्वेन ब्रावो त्रि. गो. स्टार्क ०, रविंद्र जडेजा नाबाद ०, आर. अश्विन नाबाद १. अवांतर ७, एकूण १९.५ षटकात ७ बाद १४०. गोलंदाजी : मिचेल स्टार्क ४-०-२७-१, एस. अरविंद ४-०-२५-१, हर्षल पटेल ३.५-०-२६-१, डेव्हीड वीस ४-०-३०-१, युझवेंद्र चहल ४-०-२८-२.