शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

चेन्नई पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक

By admin | Published: May 10, 2015 4:24 AM

आधीच्या लढतीत पराभूत झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाची परतफेड करायची आ

चेन्नई : आधीच्या लढतीत पराभूत झालेल्या चेन्नई सुपरकिंग्सला रविवारी आयपीएल-८ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाची परतफेड करायची आहे; शिवाय विजयासह अव्वल स्थानदेखील भक्कम करण्याची इच्छा आहे.सलग तीन विजयांसह चेन्नईने सुरुवात केली. १९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सने त्यांची विजयी वाटचाल थोपविली होती. दोन वेळच्या चॅम्पियन संघाने मात्र पराभवाने खचून न जाता पुढील चार सामने ओळीने जिंकले. त्यानंतर कोलकाता आणि हैदराबादकडून पराभवाचे धक्के बसले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला नमवून चेन्नईने पुनरागमन केले; पण पुन्हा मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा धक्का बसला. महेंद्रसिंंह धोनीच्या नेतृत्वाखालील हा संघ उद्या रॉयल्सला नमवीत विजयीपथावर येण्यास इच्छुक वाटतो. दुसरीकडे राजस्थानने सुरुवातीचे पाच सामने जिंकल्यानंतर २१ एप्रिल रोजी किंग्स पंजाबकडून पराभवाचे तोंड पाहिले; नंतर आरसीबीनेही त्यांचा पराभव केला. याशिवाय, आरसीबी आणि केकेआरविरुद्धचे सामने पावसात वाहून गेले. ३ मे रोजी झालेल्या सामन्यात या संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला; पण सनरायजर्स हैदराबादने त्यांचा पराभव केला. १२ सामन्यांत ६ विजय नोंदवीत राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. उद्या विजयासह त्यांचे ‘प्ले आॅफ ’ निश्चित होईल.धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने ११ पैकी ७ सामने जिंकले. दोन वेळचा विजेत्या चेन्नईकडे ब्रँडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ हे सलामीवीर आहेत. मधल्या फळीत सुरेश रैना, फाफ डु प्लासिस आणि स्वत: धोनी आहे. सध्याच्या पर्वात चेन्नईचा मारा प्रभावी ठरला आहे. आशिष नेहरा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी १७ बळी घेत अव्वल स्थान गाठले. मोहित शर्मा, फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि पवन नेगी यांनी आपापले काम चोखपणे बजावले. आयपीएलच्या पहिल्या सत्रातील विजेत्या राजस्थानकडे सलामीवीर अजिंक्य रहाणे हा हुकमी खेळाडू आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी असलेल्या या खेळाडूला साथ देण्यासाठी स्टीव्ह स्मिथ आणि वॉटसन आहेतच. संजू सॅमसन व करुण नायर हेदेखील धावा काढू शकतात. गोलंदाजीत टिम साऊदी, धवल कुलकर्णी आणि वाटसन हे उपयुक्त असून, प्रवीण तांबे आणि जेम्स फॉल्कनर हे मधल्या षटकामध्ये फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे काम यशस्वीपणे करू शकतात. (वृत्तसंस्था)