शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

महापौर बुध्दिबळ: मार्टिनला अर्जुनने बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 9:12 PM

मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले.

मुंबई :  मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले तर भारताचा फिडे मास्टर राजा रीथ्विकने युक्रेनचा ग्रँडमास्टर नेवेरोव वालेरीयवर मात केली.दोघा भारतीयांनी या नेत्रदीपक कामगिरीमुळे ४.५ गुणासह ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिन, तृतीय मानांकित ग्रँडमास्टर अमानातोव्ह फारुख, पंधरावा मानांकित ग्रँडमास्टर तरान तुअन मिन्ह यांच्यासोबत संयुक्त पहिल्या स्थानाची आघाडी घेतली.

महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील पहिल्या पटावर ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिन विरुध्द फिडे मास्टर एरीगीसी अर्जुन यामधील लढत फ्रेंच डिफेन्स पद्धतीने सुरु झाली. दोघांनी एकमेकांना अजमविण्याचे डावपेच रचूनही अखेर ४२ व्या चालींला बरोबरी मान्य केली. दुसऱ्या पटावर क्वीन्स इंडियन डिफेन्सने सुरु झालेल्या लढतीमध्ये चौथा मानांकित ग्रँडमास्टर रोझुम इवान विरुद्ध पंधरावा मानांकित तरान तुअन मिन्हने ७२ व्या चालीला बरोबरी साधली. भारताचा फिडे मास्टर राजा रीथ्विकने ग्रँडमास्टर नेवेरोव वालेरीयचा चुरशीचा पराभव करून साखळी एक गुण वसूल केला. राजा रीथ्विकची बाजू किंचीतसी वरचढ असतांना ३० व्या चालीला नेवेरोव वालेरीयने डाव बरोबरीत सोडविण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु रीथ्विकने कोणताही धोका न पत्करता आक्रमणाची धार वाढवीत अखेर ७६ व्या चालीला प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. संयुक्त आघाडीच्या दुसऱ्या स्थानावर ४ गुणांसह चौथा मानांकितग्रँडमास्टर रोझुम इवान, सहावा मानांकित भारताचा ग्रँडमास्टर संदीपन चंदा आदी २२ बुध्दिबळपटू आहेत.

टॅग्स :Chessबुद्धीबळSportsक्रीडा