Chess World Cup 2023 Final Live : चेस वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय शिलेदार प्रज्ञाननंदा आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात लढत सुरू आहे. दुसऱ्या दिवशी देखील नवा चॅम्पियन न मिळाल्याने उद्या अर्थात गुरूवारी जगाला नवीन चेस चॅम्पियन मिळणार आहे. मंगळवारी अंतिम फेरीचा पहिला गेम ३५ चालीनंतर अनिर्णित राहिला. त्यानंतर बुधवारी देखील गेम अनिर्णित राहिल्यामुळे उद्या टायब्रेकवर निर्णय दिला जाईल.
ही किताबी लढत अझरबैजानमधील बाकू येथे होत असून गुरूवारी चॅम्पियन ठरणार आहे. बुधवारी प्रज्ञाननंदा काळ्या मोहऱ्यांसह खेळला आणि दुसरा गेम देखील अनिर्णित राहिल्यामुळं टायब्रेकरद्वारे विजेता निश्चित केला जाईल. प्रज्ञाननंदा आणि कार्लसन यांच्यातील अंतिम फेरीचा दुसरा सामनाही अनिर्णित राहिला. ३० चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी साधली. आता गुरुवारी टायब्रेकरवरून चॅम्पियनचा निर्णय होणार आहे.