Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : भारताचा १८ वर्षीय बुद्धीबळपटूआर प्रज्ञाननंदानेबुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये नंबर १ मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली आहे. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञाननंदाने पहिला सामना ड्रॉ सोडवला, तर दुसऱ्या सामन्यात कार्लसनकडे पांढऱ्या मोहऱ्यांचे अडव्हांटेज असूनही भारताच्या युवा खेळाडूने ड्रॉवर समाधान मानण्यास भाग पाडले.त्यामुळे फायनल २५-२५ मिनिटांच्या रॅपिड गेममध्ये गेली आणि प्रज्ञाननंदाने पांढऱ्या मोहऱ्यांसह आज सुरूवात केली. पण, ही लढत अटीतटीची झाली. आघाडीवर असलेल्या प्रज्ञाननंदाला कार्लसनने वेळेच्या जोरावर पहिल्या टाय ब्रेकरमध्ये हार मानन्यास भाग पाडले.
Blog: १८ व्या वर्षी तो जग जिंकायला निघाला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा
प्रज्ञाननंदा शांत डोक्याने एकेक चाल आखत होता अन् कार्लसनला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करताना दिसला. ११व्या प्रज्ञाने वझीर बाहेर काढला, तर पुढच्या चालीत कार्लसननेही वझीर बाहेर काढला. १४व्या चालीत प्रज्ञाने त्याच्याच्या वझारीची G5 चाल खेळली अन् कार्लसन गोंधळलेला दिसला. १८व्या चालीत दोघांनी एकमेकांचे वझीर मारले. कार्लसनने उत्तम बचावाचा नमूना सादर केला. पण, कार्लसनचा निर्धारित वेळ संपत चालला होता आणि त्यामुळे तो दडपणात जाताना दिसला. २५व्या चालीनंतर कार्लसनकडे ४.४८ मिनिटे होती, तर प्रज्ञाननंदाकडे ६ मिनिटांचा अडव्हाटेंज होता.
बचावात्मक पवित्र्यात गेलेल्या कार्लसनला २९व्या चालीत प्रज्ञाननंदाने g4चाल करून अचंबित केले. प्रज्ञाननंदाने आक्रमक खेळ केला. ३३व्या चालीत कार्लसनने त्याचा हत्ती भारतीय खेळाडूच्या हत्तीच्या समोर उभा केला. त्याला अपेक्षित चाल प्रज्ञाननंदाने खेळली अन् हत्तीचा बळी देऊन कार्लसनने घोडा वाचवला. पण, आता घड्याळाचे काटे फिरले अन् कार्लसनकडे अडीच मिनिटांचा वेळ शिल्लक होता, तर प्रज्ञाननंदकडे एक मिनिटांहून अधिक वेळ राहिला होता. तरीही १८ वर्षीय खेळाडूच्या चेहऱ्यावर कुठेच घबराट दिसली नाही. ४७व्या चालीनंतर प्रज्ञाननंदाने वेळेअभावी डाव सोडला अन् कार्लसनने १ गुणाची कमाई केली. आता पुढील टाय ब्रेकरमध्ये प्रज्ञाननंदाला विजय मिळवावा लागणार आहे.