शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

चिमुरड्या सुहानीने नोंदवला कॅण्डीडेट मास्टरचा विक्रम

By admin | Published: July 18, 2016 9:51 PM

येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनलची सहा वर्षीय बुध्दिबळपटू सुहानी लोहियाने नवा पराक्रम नोंदवताना मुंबईची पहिली महिला कॅण्डीडेट मास्टरचा किताब पटकावला.

आशियाई कांस्य पदक : किताब मिळवणारी पहिली महिला मुंबईकर खेळाडू

मुंबई : येथील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनलची सहा वर्षीय बुध्दिबळपटू सुहानी लोहियाने नवा पराक्रम नोंदवताना मुंबईची पहिली महिला कॅण्डीडेट मास्टरचा किताब पटकावला. प्रशिक्षक व फिडे मास्टर बालाजी गुटुला यांनी दिलेल्या माहितीनुसार सुहानीने रविवारी इराण (तेहराण) येथे झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ७ वर्षांखालील गटात कांस्य पदक पटकावून हा मान मिळवला. सुहानीने नऊ पैकी सात गुण पटकावून कांस्य पटकावले. त्याचवेळी फिलिपिन्सच्या मेसेक एंजेला (८) आणि उझबेकिस्तानच्या खामदामोवा अफ्रुजा (७.५) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावले. संपुर्ण आशिया खंडातील एकूण १७ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, सिंगापूर, फिलिपिन्स, उझबेकिस्तान आणि यजमान इराण सारखे बलाढ्य देश सहभागी होते. या स्पर्धेत चमकदार यश मिळवताना सुहानीने जागतिक बुध्दिबळ संघटनेच्या (फिडे) वतीने देण्यात येणारा महिला कॅण्डीडेटचा किताब पटकावताना पहिली महिला मुंबईकर खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला. यंदा नागपूरला झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पटकावल्यानंतर सुहानी यावर्षाच्या अखेरीस जॉर्जियामध्ये होणाऱ्या जागतिक युवा बुध्दिबळ अजिंक्यपद सहभागी होणार असल्याची माहिती गुटुला यांनी दिली. (वृत्तसंस्था)