शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!

By admin | Published: June 12, 2017 3:21 AM

महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला.

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमतचांगली सवय लागायला वेळ लागतो, पण वाईट खोडी मात्र सुटता सुटत नाहीत. काहीशी अशीच अवस्था झाली आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची. महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला. त्याचाच फायदा उठवत विराट कोहलीच्या भारतीय संघाने अगदी करो वा मरो अशी स्थिती असलेल्या लढतीत या चोकर्सना पुन्हा एकदा जोकर बनवले.श्रीलंकेकडून मार खाल्ल्यानंतर भारतासाठी ही लढत काहीशी कठीण मानली जात होती. त्याला कारणही तसेच होते म्हणा, एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला दक्षिण आफ्रिकचा संघ भारतीय संघापेक्षा कांकणभर सरस भासत होता. त्यामुळे ते भारतीय संघाची विकेट तर काढणार नाहीत ना? अशी भीती भारतीय क्रिकेटप्रेमींना राहून राहून वाटत होती. पण प्रत्यक्षात शत्रूला बलाढ्य समजून मोठ्या तयारीनिशी मोहिमेवर जावे आणि शत्रूने पहिल्या प्रहराच हार मानून पांढरे निशाण फडकवावे, तसे पांढरे निशाण दक्षिण आफ्रिकेने विराटसेनेसमोर फडकवले.

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

तसे ते महत्त्वाच्या लढतीत कोलमडण्यासाठी कुप्रसिद्ध आहेतच. त्यांच्या या दुर्गुणाचा आपणही अनेकदा फायदा उचललाय. आजही तेच केले. नाणेफेकीचा कौल आपल्यासाठी शुभशकून ठरला. मग आपली गोलंदाजी पुन्हा बहरली. सलामीलाच पाकिस्तानचे शिरकाण केल्यानंतर लंकेविरुद्ध मात्र गोलंदाज मंडळी थंडावल्यासारखी वाटली. पण आफ्रिकेविरुद्ध मात्र गोलंदाजीत पुन्हा आग दिसली. कमाल म्हणजे आज आपले क्षेत्ररक्षण जबरदस्त झाले. एवढे जबरदस्त की समोरचे आफ्रिकन फलंदाज गोंधळले. अगदी अमला, डीकॉक, डीव्हिलियर्स, मिलर, दुमिनी, मॉरिस असे फर्डे फटकेबाज दिमतीला असतानाही. आपल्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी कामगिरी चोख बजावली. त्यांच्या चक्रव्यूहात आफ्रिकी फलंदाज अलगद अडकले, अडखळले आणि भांबावलेल्या अवस्थेत बाद झाले.

आणखी वाचा - "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

बाकी 192 ही काय आपल्यासाठी अवघड बाब नव्हती. गोलंदाजांनी आधीच बुरुजांना सुरुंग लावल्याने फार हानी न होता आफ्रिकन किल्यावर निशाण फडकवण्याचे काम फलंदाजांवर होते. धवन आणि कोहलीने ते अगदी आरामात पार पाडले. आता उपांत्य फेरीत आपली गाठ बांगलादेशशी पडण्याची शक्यता आहे. स्पर्धेत काहीशा नशिबवान ठरलेल्या बांगलादेशपेक्षा विराटसेना नक्कीच उजवी आहे. पण आपल्याला गाफील राहणे परवडणार नाही.