शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

गंभीर भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी दावेदार

By admin | Published: April 30, 2017 2:03 AM

गौतम गंभीर आयपीएलच्या दहाव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणारा खेळाडू आहे. तो नैसर्गिक फलंदाजी करीत आहे. चेंडू त्याच्या बॅटवर आदळल्यानंतर धाव नक्की मिळत

- रवी शास्त्री लिहितात...गौतम गंभीर आयपीएलच्या दहाव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणारा खेळाडू आहे. तो नैसर्गिक फलंदाजी करीत आहे. चेंडू त्याच्या बॅटवर आदळल्यानंतर धाव नक्की मिळत आहे. तो कर्णधार म्हणून खेळत आहे, ही वेगळी बाब. त्याने सुनील नरेनला सलामीला खेळविण्याचा धाडसी व शानदार निर्णय घेतला. डावाच्या १८व्या षटकात धोनीविरुद्ध त्याने कुलदीप यादवला गोलंदाजीला पाचारण केले. त्याचसोबत त्याने उथप्पावरील विश्वास कायम ठेवला. त्याला आपल्या खेळाडूंवर विश्वास आहे. त्यासाठी मनीष पांडे व युसूफ पठाण यांचे उदाहरण देता येईल. स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध त्याने नरेनला गोलंदाजीची संधीच दिली नाही. केकेआरचा संघ मैदानात असताना त्यांच्याविरुद्ध दुहेरी धावा घेणे सोपे काम नसते.एका फलंदाज म्हणून गंभीरला रोखणे कठीण भासत आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके व चौकार लगावले आहेत. तो शानदार कट शॉट खेळत आहे. चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेला फटकावून धावा वसूल करीत आहे. त्याने आतापर्यंत केवळ एकमेव षटकार ठोकला आहे. त्यावरून खेळपट्टीवर अन्य पर्यायांचा वापर करण्यास पसंती देत असल्याचे द्योतक आहे. त्याला एका टोकावर रोखून ठेवणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी आव्हान ठरतआहे. त्याने आपल्या स्टान्समध्ये थोडा बदल केला आहे. तो आता अधिक ओपन शोल्डर स्टान्स घेतो. कुठल्याही फलंदाजासाठी आपल्या फलंदाजी तंत्रात बदल करणे कठीण काम असते.गंभीर निश्चित टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्याचा दावा करण्याचा हकदार आहे. के. एल. राहुल चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीला खेळलेला नाही, तर शिखर धवन त्यासाठी वॉर्मअप करीत आहे. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर ३४ वर्षीय गंभीर चांगला पर्याय ठरू शकतो. या पर्यायाने आता आणखी वेग धरला आहे. (टीसीएम)