शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

अंतिम फेरीसाठी ‘टक्कर’

By admin | Published: May 19, 2015 1:30 AM

मुंबई इंडियन्स मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर तगड्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल-८ ची थेट अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने लढेल.

पहिली क्वालिफायर लढत : मुंबई ‘लोकल’ व चेन्नई ‘एक्स्प्रेस’ भिडणारमुंबई : रविवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या निर्णायक लढतीत धमाकेदार विजय मिळवून दिमाखात प्ले आॅफ गाठलेले मुंबई इंडियन्स मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर तगड्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल-८ ची थेट अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने लढेल.यंदाच्या सत्रात पहिले चार सामने सलग गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सकडून साऱ्यांनीच अपेक्षा सोडल्या होत्या. क्वालिफायर तर दूर, पण स्पर्धेची प्ले आॅफ फेरी गाठण्यात तरी मुंबईला यश येईल का, अशी शंका व्यक्त होऊ लागली. मात्र, यानंतर मुंबईने सर्वांनाच चकीत करताना विजयी मालिका गुंफली आणि थेट गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकवर झेप घेऊन क्वालिफायरमध्ये तगड्या चेन्नईसमोर आव्हान उभे केले. विशेष म्हणजे गतस्पर्धेतदेखील मुंबईने पहिल्या पाच सामन्यांत सलग पराभव पत्करल्यानंतर सलग विजयी मालिका गुंफताना प्ले आॅफ फेरी गाठली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती मुंबईने यंदादेखील केली.मंगळवारचा प्ले आॅफ सामना अत्यंत चुरशीचा व अटीतटीचा होईल, यात शंकाच नाही. परंतु हा सामना मुंबईत होणार असल्याने मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानाचा फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत बलाढ्य चेन्नईसमोर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईचे कडवे आव्हान असेल. या सामन्याद्वारे दोन्ही संघांना अंतिम फेरीसाठी अतिरिक्त संधी मिळेल. कारण विजेता संघ थेट अंतिम फेरीत जाईल, तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी एलिमिनेटर सामन्यातील राजस्थान रॉयल्स - रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. संपूर्ण स्पर्धेत मुंबईची कमजोर ठरलेली गोलंदाजी साखळी फेरीच्या शेवटच्या काही सामन्यांत फॉर्ममध्ये आल्याने चेन्नईची डोकेदुखी वाढली आहे. त्यात मुंबई घरच्या मैदानावर खेळणार आणि धडाकेबाज सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमदेखील मायदेशी परतल्याने चेन्नई काहीसे बॅकफुटवर आले आहेत.दुसरीकडे २१मेपासून इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी मॅक्युलम मायदेशी परतल्याने चेन्नईला फटका बसेल. मॅक्युलमच्या दांडपट्ट्याच्या जोरावर चेन्नईने कायमच आक्रमक सुरुवात करताना प्रतिस्पर्ध्यांवर वचक बसवली. त्याच्या जागी चेन्नईने आपल्या गत सामन्यात आॅस्टे्रलियाचा माजी फलंदाज माईक हसीला खेळवले. मात्र, त्याला चमक दाखवता आली नाही. परंतु एकूणच हसीचा दीर्घ अनुभव पाहता चेन्नई त्याच्यावरचा विश्वास ढासळू देणार नाही. तरी, चेन्नईकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची भरणा असल्याने मुंबईला एक चूकदेखील महागात पडू शकते. शिवाय आयपीएल इतिहासातील सर्वाधिक निर्णायक लढती खेळण्याचा अनुभव असल्याने मुंबई चेन्नईला गाफील धरून ठरणार नाही. फलंदाजीमध्ये चेन्नई ड्वेन स्मिथ, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यावर अवलंबून असेल. तर, गोलंदाजीची मदार आशिष नेहरा, मोहित शर्मा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि पवन नेगी यांच्यावर असेल. (क्रीडा प्रतिनिधी)च्फिरकीपटू हरभजनसिंग व जगदीश सुचिथ यांचा आक्रमक अष्टपैलू खेळ मुंबईसाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरत आहे. याव्यतिरिक्त लैंडल सिमेन्स, पार्थिव पटेल हे सलामीवीर, कर्णधार रोहित शर्मा, स्फोटक किरॉन पोलार्ड आणि युवा हार्दिक पांड्या यांचा खेळदेखील मुंबईसाठी निर्णायक ठरत आहे.च्मुंबईच्या मिचेल मॅक्क्लेनघन व लसिथ मलिंगा या हुकमी वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत अनुक्रमे १४ व १९ बळी घेऊन आपली छाप पाडली आहे. मुंबईला गतवर्षीचा वचपा काढण्याची संधी आयपीएल ७ च्या सत्रात २८ मे २०१४ रोजी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ मुंबई येथील ब्रेबॉन स्टेडियमच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध भिडले होते. त्या वेळी चेन्नईने मुंबईला ७ विकेटने पराभूत केले होते. या सत्रातील लढतीच्मुंबई येथे १७ एप्रिल रोजी चेन्नईने मुंबईचा ६ विकेट्सने पराभव केला होता.च्चेन्नई येथे ८ मे रोजी मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला होता.च्वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गत दोन सामन्यांत पराभूत झाला आहे. त्या आधी मुंबईने सलग चार विजय नोंदविले आहेत. च्वानखेडेची खेळपट्टी उद्याच्या लढतीसाठी फलंदाजांना साथ देण्याची शक्यता आहे. १८० ते १९० पर्यंत संघांची धावसंख्या होईल असे वर्तविण्यात येत आहे. रोहित शर्मा (कर्णधार), अंबाती रायडू, अभिमन्यू मिथून, आदित्य तरे, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, हरभजनसिंग, जसप्रीत बुमराह, मर्चेंट डि लांगे, पवन सुयाल, श्रेयश गोपाल, लैंडल सिमेन्स, प्रग्यान ओझा, मिचेल मॅक्क्लेनघन, एडेन ब्लिझार्ड, अक्षय वखारे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचिथ, उन्मुक्त चंद, बेन हिल्फेनहास, कोलिन मुन्रो, आर. विनयकुमार आणि अलेक्स हेल्स.महिंद्रसिंह धोनी (कर्णधार), आशिष नेहरा, बाबा अपराजित, ड्वेन ब्रावो, ड्वेन स्मिथ, फाफ डु प्लेसिस, ईश्वर पांड्ये, मैट हेन्री, मिथुन मिन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सॅम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकल हसी, राहुल शर्मा, काइल एबोट, अंकुश बैस, इरफान पठाण, प्रत्युष सिंग, अँड्र्यू टाये आणि एकलव्य द्विवेदी.