गणपती कोळी - कुरुंदवाड
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील गणोश माळी याने आपल्या कर्तृत्वाचा ङोंडा त्रिखंडात फडकवून बिल्डिंग पेंटर असलेल्या वडील चंद्रकांत माळी यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले; तर पोरांचं स्वप्न साकार होण्यासाठी दुस:याच्या शेतात बांध खुरपणा:या आई अनिता यांच्या हातात यशाचे क्षितिज आणून दिले; पण आपल्या मुलाने केलेला पराक्रम त्यांच्या गावीही नव्हता. आज, शुक्रवारी पहाटे 3 वाजता गणोश माळीने कांस्यपदक मिळविले. आज सकाळी ही वार्ता कुरुंदवाड आणि परिसरात पसरताच गणोशच्या आई-वडिलांचे अभिनंदन करायला नागरिकांनी गर्दी केली. मात्र, चंद्रकांत माळी आजही पेंटिंगसाठी, तर आई मोलमजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या.
कुरुंदवाड येथे दोन खोल्यांच्या साध्या कौलारू घरात माळी कुटुंब वास्तव्यास आहे. चंद्रकांत हे बिल्डिंग पेंटर म्हणून मजुरीवर काम करतात, तर आई अनिता या दुस:याच्या शेतात खुरपणी करतात. गणोश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरी व्यायामासाठी त्याला सवड देणो आणि त्याच्या खुराकावर पैसा खर्च करण्याइतकी त्यांची श्रीमंती नाही मात्र मनाची श्रीमंती अफाट.
त्यांनी गणोशला त्याची व्यायामाची आवड जोपासण्यासाठी आणखी कष्ट करायचे ठरविले. वयाच्या 12व्या वर्षी तो हक्र्युलस जिममध्ये दाखल झाला. प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी त्याची आवड आणि चुणूक हेरली. त्यांनी त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तयार करण्याचे ठरविले. साधारण वर्षभरापूर्वी तो हवाईदलामध्ये भरती झाला आणि त्यांच्या पंखांना नवीन बळ मिळाले. गणोशनेही प्रशिक्षकांचा विश्वास न तोडता परिश्रम केले आणि त्याचे फळ त्याला कांस्यपदकाच्या रूपाने मिळाले.
आज गणोशने राष्ट्रकुल स्पर्धा गाजविली. आता तो आशियाई स्पर्धेत खेळेल; पण त्याचे अंतिम लक्ष्य अर्थातच ऑलिम्पिक असणार आहे. 2020च्या टोकिओ ऑलिम्पिकसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्याचे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याच्या हातून देशाचे नाव मोठे व्हावे, ही त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी आणखी कष्ट करावयास ते तयार आहेत.