शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

आजपासून रंगणार रंगीत तालीम

By admin | Published: February 17, 2017 12:34 AM

शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्यासह भारत ‘अ’ संघातील प्रमुख खेळाडू

मुंबई : शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्यासह भारत ‘अ’ संघातील प्रमुख खेळाडू भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या निर्धाराने खेळतील. गेल्या काही मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केलेला हार्दिक या सराव सामन्यातही चमकदार कामगिरीसह कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलियाच्या जोश हेजलवुड आणि मिशेल स्टार्कसारख्या तगड्या गोलंदाजांसह स्वत:ची क्षमता जाणून घेण्याची संधी हार्दिकला मिळेल. त्याचप्रमाणे सलामीवीर प्रियांक पांचाळने रणजी सत्र गाजवल्यानंतर बांगलादेशविरुध्दच्या सराव सामन्यात शतक ठोकले होते. मात्र, आॅस्टे्रलियाच्या भेदक माऱ्यापुढे त्याचा खरा कस लागेल. तसेच, १९ वर्षांखालील भारतीय संघाचा माजी फलंदाज रिषभ पंत आणि इशान किशन यांच्यावरही भारत ‘अ’च्या फलंदाजीची मदार असेल. दोघेही उत्कृष्ट यष्टीरक्षक असून यंदाच्या रणजी व सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत दोन्ही फलंदाजांनी आपली चमक दाखवली आहे. श्रेयश अय्यर आणि अखिल हेरवाडकर या मुंबईकरांवरही विशेष लक्ष असेल. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पांचाळसह हेरवाडकर डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. मधल्या फळीत महाराष्ट्राच्या अंकित बावणे आणि तमिळनाडूच्या बाबा इंद्रजितवर मदार असेल. खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगली उसळ मिळण्याची अपेक्षा आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवसह झारखंडचा शाहबाज नदीम कांगारुंना नाचवण्याची क्षमता राखून आहेत. तसेच, हैदराबादचा मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार असून त्याच्यासह दिंडा व हार्दिक आॅसीला रोखण्याचा प्रयत्न करतील. (क्रीडा प्रतिनिधी)निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याची संधी : हार्दिकच्कसोटी क्रिकेटची दारे ठोठावित असलेला वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्या संधीच्या शोधात आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी आज शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविण्यात आले. या सामन्याद्वारे निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दमदार कामगिरी करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.पत्रकारांशी बोलताना हार्दिक म्हणाला, ‘अ संघात खेळणाऱ्या सर्वच युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी असेल. मला कसोटी संघात स्थान मिळवायचे असल्याने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याचे लक्ष्य राहील.’वन-डेचा तज्ज्ञ खेळाडू असलेल्या हार्दिकने वेगवान माऱ्यात सुधारणा केली. सराव सामन्यात प्रभावी ठरल्यास कर्णधार कोहली आणि कोच कुंबळे पुढच्या सामन्यांसाठी त्याचा विचार करू शकतात. तो म्हणाला, ‘मी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळलो होतो. माझ्यासाठी तो चांगला अनुभव ठरला. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू आक्रमक असल्याने चांगली स्पर्धा अनुभवायला मिळते.’इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध कसोटीसाठी संधी मिळूनदेखील हार्दिकला अंतिम एकादशमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तथापि कर्णधार आणि कोच यांनी अष्टपैलू या नात्याने गुजरातच्या या खेळाडूचे कौतुक केल्याने हार्दिकचे मनोबल उंचावले.७ वन-डे आणि १९ टी-२० सामने खेळलेला हार्दिक पुढे म्हणतो, ‘कोच आणि कर्णधारांनी कौतुक केल्यामुळे बळ मिळाले. राष्ट्रीय संघात खेळायचे झाल्यास क्रिकेटचा प्रकार बदलल्यास ताळमेळ बसविणे शिकायला हवे, असे मला कळले आहे. हे कठीण काम असले तरी याचा थेट संबंध मानसिकतेशी आहे. सध्या जे महान खेळाडू तिन्ही प्रकारात खेळताना दिसतात हे अनेक वर्षांपासून ताळमेळ बसविताना दिसतात. संघासाठी हे तंत्र शिकायलाच हवे.’ (वृत्तसंस्था)सराव सामन्यासाठी संघ :भारत ‘अ’ : हार्दिक पंड्या (कर्णधार), अखिल हेरवाडकर, प्रियांक पांचाळ, श्रेयश अय्यर, अंकित बावणे, रिषभ पंत, इशान किशन, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गोथम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक दिंडा, मोहम्मद सिराज, राहुल सिंग आणि बाबा इंद्रजित. आॅस्टे्रलिया : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, अशोक एगर, जॅक्सन बर्ड, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीफन ओकीफे, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन आणि मॅथ्यू वेड.