ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - कोहली आणि कुंबळे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. या रागाच्या भरात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या स्वागताचं ट्विट अकाऊंटवरून काढून टाकलं आहे. अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर 23 जून 2016 रोजी कोहलीनं हे ट्विट केलं होतं. कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, अनिल कुंबळे सर तुमचं मनापासून स्वागत, आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. गेल्या 6 महिन्यांपासून कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कोणत्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याची बाब समोर आली होती. या सर्व गोष्टी समजल्यानंतर बीसीसीआयलाही मोठा धक्का बसला होता.बीसीसीआय अधिका-यांना टीम इंडियामध्ये काही आलबेल नसल्याची आधीच शंका होती. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील मुख्य सल्लागार समितीनंही कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी थेट हिरवा कंदील दाखवला नव्हता. या सर्व प्रकरणावर लंडनमधल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-यानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, रिपोर्ट्समध्ये कुंबळेच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात विचार होता. मात्र सगळ्या अडचणी दूर झाल्यावरच कुंबळेला पुन्हा प्रशिक्षकपद दिलं पाहिजे, अशीही एक अट होती.
विराटनं कुंबळेच्या स्वागताचं ट्विट केलं डिलीट
By admin | Published: June 22, 2017 6:40 PM