नवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री आणि सहयोगी स्टाफचे वेतन निश्चित करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीत बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सीईओ राहुल जोहरी यांचा समावेश आहे. सीओएच्या डायना एडलजी आणि बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी हे अन्य सदस्य आहेत.समितीची बैठक १९ जुलै रोजी होईल. शनिवारी सीओए बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यांच्या सीएसीने शास्त्री यांना कोच निवडले होते. राहुल द्रविड आणि झहीर खान यांनादेखील विदेशातील विशिष्ट दौऱ्यांसाठी फलंदाजी आणि गोलंदाजी कोच नेमण्यात आले. नवी समिती आपली शिफारस २२ जुलै रोजी सीओएकडे सोपवेल. भारतीय संघ १९ ला श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार असल्याने झहीर आणि द्रविड संघासोबत जातील का हे स्पष्ट नाही. भारत-लंकेदरम्यान पहिली कसोटी २६ जुलैपासून खेळली जाईल. (वृत्तसंस्था)झहीरबाबत निर्णय नाहीप्रशासकांच्या समितीने आजच्या बैठकीदरम्यान रवी शास्त्री यांच्या नियुक्तीला मुख्य कोच म्हणून मंजुरी बहाल केली. शास्त्री यांच्या सहयोगी स्टाफचा भाग असलेले झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्या मंजुरीचा निर्णय मात्र २२ जुलैपर्यंत लांबणीवर टाकला. अन्य सल्लागारांची नियुक्ती कोचसोबत चर्चेनंतर केली जाईल, असे वृत्तात म्हटले आहे. द्रविड आणि झहीर यांची नियुक्ती काही विदेश दौऱ्यांसाठी आहे का, हे देखील समितीने स्पष्ट केले नाही.
शास्त्री यांच्या वेतन निश्चितीसाठी समिती
By admin | Published: July 16, 2017 2:07 AM