ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - लोढा समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयच्या कार्यकारी समितीचे सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. भारतीय क्रिकेट मंडळामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. लोढा यांच्या नेतृत्वाखाली लोढा समितीची नियुक्ती केली आहे.
अमिताभ चौधरी यांनी आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर सांगितले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी एका समितीची नियुक्ती करणार आहे. या समितीची नियुक्ती उद्या केली जाईल. ही समिती मंडळाला एक अहवाल सादर करेल. ज्यात एक राज्य एक मत, ७०व्या वर्षापर्यंतच पद भूषवण्याची अट आदींवर अभ्यास केला जाईल.
दरम्यान आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेविषयीसुद्धा चर्चा झाली.
BCCI will constitute a committee which will examine how best quickly principal order of SC dated July 18 are implemented: Acting Secy, BCCI pic.twitter.com/l3cJUF5Clk— ANI (@ANI_news) June 26, 2017
The committee will be constituted tomorrow and should have its first recommendations in a fortnight’s time: Acting Secy Amitabh Chaudhary pic.twitter.com/q9LG4uC0r7— ANI (@ANI_news) June 26, 2017