गोल्ड कोस्ट : गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मंगळवारी भारतीय बॉक्सरचा दबदबा बघायला मिळाला. फंगल आणि नमन तंवरनंतर दिवसाच्या शेवटी हुसामुद्दीन मोहम्मद, मनोज कुमार आणि सतीश कुमार यांनी आपापल्या कॅटेगरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे भारताचे कमीत कमी पाच ब्रॉंझ पदकं निश्चित झाले आहेत.
मोहम्मदने 56 किलोग्रॅम वर्गाच्या क्वार्टर फायनलमध्ये झाम्बियाच्या एवरिस्टो मुलेंगाला मात दिली. त्यानंतर लगेच एका दुस-या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टेरी निकोलसला मनोज कुमारने मात दिली. यासोबतच मनोज कुमार 69 किलोग्रॅम वर्गाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला. दुसरीकडे सतीश कुमार सुद्धा 91 किलोग्रॅम वर्गाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला. मनोजने त्रिनिदाद अॅन्ड टोबॅगोत्या निजेल पॉल याला हरवले.
याआधी अमित आणि नमन तंवरने अंतिम चारमध्ये जागा मिळवत ब्रॉंझ पदक निश्चित केले होते. अमितने पुरुषांच्या 49 किलोग्रॅम कॅटेगरीच्या क्वार्टर फायनलमध्ये स्कॉटलॅंडच्या अकिल अहमदला पराभूत केले. तर नमन तंवरने 91 किलोग्रॅम वर्गात सामोआचा बॉक्सर फ्रॅंक मासोएला पराभूत केले.
दरम्यान, याआधी रविवारी महिला बॉक्सर मेरी कॉमने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून एक पदक निश्चित केलं आहे.