गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्सची आज मोठ्या दणक्यात सुरुवात झाली आहे. आज भारताच्या अनेक खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण चार सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. त्या आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. नीरज चोप्रा याने भालाफेक या खेळप्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. हे राष्ट्रकुल स्पर्धेतील भालाफेक खेळप्रकारातील भारताचं पहिलं सुवर्ण पदक आहे.
दरम्यान, शनिवारची सकाळ भारताला सुवर्ण कमाई करून देणारी सकाळ ठरते आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या खेळाची सुरूवात झाल्यापासून भारताने एकुण चार सुवर्णपदकांवर नावं कोरलं आहे. पहिले बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी आणि कुस्तीपटू सुमित मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
भारतीय नेमबाज संजीव राजपूतने पुरूषांच्या 50 मीटर 3 रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने पुरूषांच्या 52 किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तर कुस्तीपटू सुमित मलिकने यशस्वी कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात आता एकुण 22 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.