शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Commonwealth Games 2018 : राष्ट्रकुलचे दिमाखदार उद्घाटन, भारताच्या मोहिमेला आजपासून होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 2:23 AM

दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली.

गोल्ड कोस्ट - दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. भारतीय पथकात दोनवेळा आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सुशील कुमार, लंडन आॅलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती मेरी कोम, सायना नेहवाल आणि गगन नारंग या दिग्गजांचा समावेश होता. भारतीय खेळाडूंचे तिरंग्यासह आगमन होताच २५ हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. दरम्यान पहिल्यांदाच भारतीय महिला खेळाडूंनी पारंपरिक वेषभूषा असलेली साडी नेसली नव्हती. यंदा भारताचे सर्व खेळाडू ब्लेझर्स आणि पँट घालून होते. (वृत्तसंस्था)राष्ट्रकुलचे पाचव्यांदा आयोजन...आॅस्ट्रेलिया पाचव्यांदा राष्ट्रकुलचे यजमानपद भूषवित आहे. गोल्ड कोस्ट व्हिलेजमध्ये खेळाडूंची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा नसताना मोकळ्या वेळात खेळाडूंना मन रमवता यावे यासाठी व्हर्च्युअल कॉम्प्युटर गेम्स, जलतरण तलाव, कृत्रिम धबधबे, पियानोची व्यवस्था करण्यात आली आहे.रिंगणात न उतरताच ‘ती’ बनली पदक विजेतीआॅस्ट्रेलियाची महिला बॉक्सर टेलाह रॉबर्टसन २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेची पहिली पदक विजेती ठरली. तिने रिंगणात न उतरताच हे पदक जिंकले. ५१ किलो वजन गटात पुढे चाल मिळताच रॉबर्टसनने थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.१९ वर्षांच्या रॉबर्टसनच्या गटात अधिक खेळाडू नसल्यामुळे तिचे पदक पक्के झाले. भारतीय खेळाडूंना मात्र या संधीपासून वंचित व्हावे लागले. एम. सी. मेरिकोमला पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाली असली तरी ८ एप्रिल रोजी क्वार्टर फायनल खेळावी लागेल.प्रथमच स्पर्धेत उतरणारी रॉबर्टसन म्हणाली,‘मी केवळ कांस्यवर समाधान मानणार नाही. मला तर सुवर्ण जिंकायचे आहे.’ भारताने ५१ किलो गटात एकाही महिला खेळाडूला संधी दिलेली नाही. भारताकडून गुरुवारी ९१ किलो वजन गटात २०१० च्या राष्टÑकुलचा सुवर्ण विजेता मनोज कुमार रिंगणात उतरणार आहे.मूळनिवासींचा विरोध...स्टेडियममधील झगमगाटातही मूळनिवासींचा विरोध प्रकर्षाने दिसून आला. या नागरिकांनी घोषणाबाजी करीत जवळपास तासभर क्वीन्स बॅटन रिले रोखून धरली. ब्रिटिश राजवटीतील क्रूरतेला हा विरोध होता. आॅस्ट्रेलियाने राष्टÑकुलसोबतचे नाते संपुष्टात आणावे, अशी मूळनिवासींची मागणी आहे. येथील मूळनिवासींवर ब्रिटिश राजवटीत अमानुष अत्याचार करण्यात आले होते.पथक प्रमुखावर विनयभंगाचा आरोप, मॉरिशसच्या महिला खेळाडूची तक्रारराष्ट्रकुल सुरू होण्याआधीच एक वाद पुढे आला आहे. मॉरिशसच्या महिला खेळाडूूने आपल्याच पथक प्रमुखावर विनयभंगाचा आरोप केला. काल रात्री मिळालेल्या तक्रारीचा अधिकृत तपास सुरू असल्याचे आॅस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले.मॉरिशसच्या मीडियानुसार पथक प्रमुख केसी तीरूवेंगादम यांच्यावर हा आरोप असून त्यांनी ताबडतोब पद सोडले. ते सध्या गोल्ड कोस्टमध्येच आहेत. राष्ट्रकुलसाठी आगमन झाल्यानंतर क्रीडाग्राममध्ये या अधिकाऱ्याने खेळाडूला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचे हे प्रकरण आहे.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Sportsक्रीडा