गोल्ड कोस्ट - युवा खेळाडूंचा उत्साह व अनुभवी खेळाडूंचा संयम याच्या जोरावर भारताने रविवारी संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शानदार कामगिरी करताना पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले.मनू भाकर, मेहुली घोष व अनिष भानवाला या युवा नेमबाजांचे त्रिकूट, मनिका बत्राची टेबल टेनिसमधील ऐतिहासिक कामगिरी आणि भालाफेकपटू नीरज चोपडाचे सुवर्णपदक यामुळे भारताच्या भावी पिढीचे स्टार खेळाडू जागतिक पातळीवर आव्हान देण्यास सज्ज असल्याची प्रचीती आली.अनुभवी सायना नेहवालने अखेरच्या दिवशी महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावित २०१० च्या स्पर्धेच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या वेळी तिने पटकावलेल्या सुवर्णपदकाच्या बळावर भारताने एकूण १०० पदकांचा आकडा गाठला होता. भारताने गोल्ड कोस्टमध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य, २० कांस्यपदकांसह एकूण ६६ पदके मिळवताना तिसरे स्थान पटकावले. ग्लासगोमध्ये यापूर्वी झालेल्या स्पर्धेच्या तुलनेत भारताने दोन स्थानांची प्रगती केली. भारताच्या युवा व अनुभवी खेळाडूंच्या संयोजनामुळे चांगले निकाल मिळाले.भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करताना १०१ पदके पटकावली होती. त्यात ३८ सुवर्ण पदकांचा समावेश होता.एम. सी. मेरी कोम, सीमा पुनिया व सुशील कुमार यांच्यासारख्या खेळाडूंनी अनुभवाकडे डोळेझाक करता येणार नसल्याचे सिद्ध केले. या तिन्ही खेळाडूंनी जुन्या दिवसांच्या स्मृतींना उजाळा देताना शानदार कामगिरी केली. नेमबाज, भारोत्तोलक, मल्ल आणि बॉक्सर्सकडून जास्तीत जास्त पदकांची आशा होती, पण टेबल टेनिसपटूंनी या वेळी चमकदार कामगिरी करीत बरीच पदके पटकावली. ग्लासगो स्पर्धेत केवळ एक पदक पटकावल्यानंतर भारताच्या टेबल टेनिसपटूंनी मनिका बत्राच्या नेतृत्वाखाली या वेळी शानदार कामगिरी केली. खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभ्यासाला तिलांजली देणाऱ्या २२ वर्षीय मनिकाने जोखीम पत्करून चूक केली नसल्याचे सिद्ध केले. मनिकाने ऐतिहासिक वैयक्तिक सुवर्णपदकाव्यतिरिक्त टीम सुवर्ण, महिला दुहेरीत रौप्य व मिश्र दुहेरीत कांस्यपदकही पटकावले. भारतीय खेळाडूंची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. दुसरीकडे ३४ वर्षांचा सुशील कुमार व ३५ वर्षांची मेरी कोम यांनी त्यांच्यात अद्याप बरीच ऊर्जा शिल्लक असल्याचे सिद्ध केले.राष्ट्रकुल खेळाडूंना संस्मरणीय निरोपउद््घाटन समारंभात इतिहास व परंपरा याची झलक बघायला मिळाली, तर समारोप समारंभात जल्लोषाचा माहोल होता. त्यात गोल्ड कोस्टने २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोपाचा आनंद साजरा केला. दिग्गज महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम भारताचीध्वजवाहक होती.गर्दीने फुललेल्या स्टेडियममध्ये १२ दिवसांपासून या शहरात असलेले हजारो खेळाडू आणि अधिकाºयांना संस्मरणीय निरोप देण्यात आला. भारताने या स्पर्धेत आपली तिसरी सर्वोत्तम कामगिरी करताना २६ सुवर्णपदकांसह एकूण ६६ पदके पटकावली.राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष लुई मार्टिन म्हणाले, ‘खेळाडूंच्या क्षमतेची कुणालाच कल्पना करता येत नाही. विश्वविक्रमवीर खेळाडूंनी आव्हान सादर केले, महान व युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.’ ते म्हणाले, ‘खेळाचा समारोप झाला आहे, पण राष्ट्रकुल स्पर्धेचे भविष्य उज्ज्वल आहे. २०१८ ची स्पर्धा यापूर्वीच्या स्पर्धांच्या तुलनेत अधिक प्रासंगिक व शानदार झाली.’समारोप समारंभत आॅस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गज गायकांनी सादरीकरण केले. या वेळी खेळाडूंनी आपापल्या देशांचे राष्ट्रध्वज उंचावत त्यांना साथ दिली. भारतीय पथकाचे नेतृत्व मेरी कोमने केले. तिने ३५ व्या वर्षात पदार्पण करताना सुवर्णपदक पटकावले.समारोपामध्ये ‘गेम शेपर्स’ म्हणून ओळखल्या जाणाºया १५००० स्वयंसेवकांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. त्यांच्या समर्पणामुळे स्पर्धा यशस्वी झाली. स्वयंसेवक समारोप समारंभात सहभागी झाले होते. अखेरचा निरोप अल्पसंख्याक समुदायाचे युगाहबेहच्या प्रतिनिधींनी दिला. त्यांना क्वीन्सलँडचे संरक्षक मानले जाते.- ३४ वर्षाचा सुशील कुमार व ३५ वर्षांची मेरी कोम यांनी त्यांच्यात अद्याप बरीच ऊर्जा शिल्लक असल्याचे सिद्ध केले. भारताने यावेळी पदकाची सीमा वाढविली.- नेमबाजीचा २०२२ च्या बर्मिघम स्पर्धेत सहभाग राहणार नाही. त्यामुळे भारताच्या पदकांच्या संख्येत घसरण होण्याची शक्यता आहे. बॅडमिंटन कोर्टवर पुन्हा एकदा सायना व पी.व्ही. सिंधू यांनी छाप सोडली, पण श्रीकांतनेही आपले वर्चस्व कायम राखले.नेमबाजांचे वर्चस्व....- भारताने स्क्वॉशमध्येही पदक पटकावले. भारताने नेमबाजीत१६, कुस्तीमध्ये १२, भारोत्तोलनमध्ये ९ व बॉक्सिंगमध्येही ९ पदके पटकावली. सुवर्णपदक पटकावण्याच्या भारताच्यामोहिमेची सुरुवात भारोत्तोलकांनी केली. त्यांनी आपली सर्वोत्तम कामगिरी केली.- सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या वेळी भारतीय भारोत्तोलक डोपिंगच्या सावटापासून दूर राहिले. मीराबाई चानू, संजीता चानू आणि सतीश शिवलिंगम हे आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत बरेच आघाडीवर राहिले.- नेमबाजांनीही छाप सोडली. बेलमोंट शूटिंग सेंटरमध्ये रोजएक सुवर्णपदक भारताच्या पदरात पडले. भारताला एकमात्र निराशा गगन नारंगकडून झाली. तो रित्या हाताने मायदेशी परतला, पण त्याच्या निराशाजनक कामगिरीची भरपाई मनू, अनिश व मेहुली यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी केली.मनिकाला ४ पदके; टेबल टेनिसमध्ये भारत अव्वल स्थानीमनिका बत्राच्या चार पदकांच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारत एकूण आठ पदकांसह अव्वल स्थानी राहिला. भारताच्या १० सदस्यीय टेबल टेनिस संघाने या स्पर्धेत आठ पदके (तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य ) पटकावली. भारताची या स्पर्धेत टेबल टेनिसमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने टेबल टेनिसमध्ये सिंगापूर व इंग्लंडला पिछाडीवर सोडत अव्वल स्थान पटकावले.दुखापतग्रस्त धावपटूंचा फोटो काढणा-यांवर टीकागोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत मॅरेथॉन स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेल्या स्कॉटलंडचा धावपटू कॅलम हॉकिन्सचे फोटो काढणाºया प्रेक्षकांवर आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क पीटर्स यांनी टीका केली. तसेच त्याला उशिरा उपचार मिळाल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. हॉकिन्स दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला वेळीच प्रथमोपचार मिळाले नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. हॉकिन्स या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांपासून दोन मिनिटांनी पुढे होता. याचवेळी तो बेशुद्ध पडला. जोपर्यंत त्याला प्रथमोपचार मिळाले तोपर्यंत आॅस्ट्रेलियाचा मायकल शेले त्याच्या पुढे गेला होता. त्याने या स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले. आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क पीटर्स यांनी सांगितले, की दुखापतग्रस्त हॉकिन्सचे तेथील उभ्या असलेल्या प्रेक्षकांनी फोटो काढले. हॉकिन्ससारख्या खेळाडूचे दुखापतग्रस्त झाल्याचे फोटो काढणे ही बाब निश्चितच निंदनीय आहे. प्रेक्षकांच्या व्यवहारामुळे मला धक्का बसला असून यातून अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडले आहे.
Commonwealth Games 2018 : युवा व अनुभवी खेळाडूंनी छाप सोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:19 AM