शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

Commonwealth Games 2022 : महाराष्ट्राच्या सुपूत्राने करिष्मा केला; अविनाश साबळेने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक, मोडली केनियन मक्तेदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 4:35 PM

Commonwealth Games 2022 : s अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेल शर्यतीच्या अंतिम फेरीत कडवी टक्कर दिली. केनियाचे तीन खेळाडूवर आघाडीवर होते अन्...

Commonwealth Games 2022 :  अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेस  ( Avinash Sable broke the 3000m Steeplechase National Record ) शर्यतीच्या अंतिम फेरीत कडवी टक्कर दिली. केनियाचे तीन खेळाडूवर आघाडीवर असतानाही अविनाश त्यांना तोडीसतोड उत्तर देत होता. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि रौप्यपदकाच्या शर्यतीत झेप घेतली. त्याची ही धाव पाहून स्टेडियमवर भारताचा जयघोष होऊ लागला. केनियाच्या खेळाडूंचीही धाकधुक वाढली होती आणि अविनाशने टफ फाईट दिली. अविनाशने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. अविनाशने 8:11.20 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.

महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील.... टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर अविनाश घरी परतला असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. पण, त्यातून सावरत पुन्हा मेहनत करत तो मैदानावर परतला.  जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अविनाश सहभागी होणार आहे. २०२२मध्ये Rabat Diamond League मध्ये ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यातीत ८:१२.४८ सेकंदाची वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम केला. त्याने ९ वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. मार्च २०२२मध्ये त्याने इंडियन ग्रँड प्रिक्स २ मध्ये ८:१६.२१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.  

१३ सप्टेंबर १९९४ मध्ये अविनाशचा जन्म... वयाच्या सहाव्या वर्षापासून घर ते शाळा असा त्याचा रोजचा ६ किलोमीटरचा पायी प्रवास सुरू झाला. मग तो कधीकधी धावत हे अंतर पार करायचा तर कधी चालत... १२वीनंतर त्याने भारतीय सैन्यात  5 Mahar regiment मध्ये दाखल झाला. २०१३-१४ मध्ये सियाचिन येथे त्याची पोस्टींग झाली, तर २०१५मध्ये राजस्थान व सिक्कीम येथे त्याची पोस्टींग झाली होती. २०१५मध्ये त्याने आंतर-सैन्य क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला. पण, ट्रेनर अमरिष कुमार यांनी त्याला स्टीपलचेल ( अडथळ्यांच्या शर्यतीत) सहभाग घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याने ३ महिन्यांत २० किलो वजन घटवले.  

#Athletics भारताच्या प्रियांका गोस्वामीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ४३ मिनिट ३८.८३ सेकंदाची वेळ नोंदवताना हे पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.  या क्रीडा प्रकारात भारताचे हे राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील पहिलेच पदक आहे. उत्तर प्रदेशच्या २६ वर्षीय प्रियांकाने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ती १७वी आली होती. अॅथलेटिक्समध्ये येण्यापूर्वी प्रियांका जिम्नॅस्टीक्स करायची. तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सुरुवात केली, कारण यामध्ये जिंकणाऱ्याला बक्षीस म्हणून बॅग दिल्या जायच्या.  फेब्रुवारी २०२१मध्ये तिने भारतीय रेसवॉकिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि १:२८.४५ असा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि २०२०च्या ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली होती.    #Wrestling  

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाMaharashtraमहाराष्ट्र