Commonwealth Games 2022 Shushila Devi Likmabam Judo : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्स पदकांची लयलूट करत आहेत. आतापर्यंत वेटलिफ्टर्सनी भारताला ६ पदकं जिंकून दिली आहेत. त्यात सोमवारी ज्युदोच्या दोन पदकांची भर पडली. २७ वर्षीय सुशीला देवी लिकमाबामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकले, तर विजय कुमारने कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही मिश्र सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना एक पदक निश्चित केले.
#Judo २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या सुशीलासमोर अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबू हिचे आव्हान होते. आफ्रिकन खेळाडू वरचढ ठरली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विजय कुमार यादव ( ६० किलो)ने ६० किलो वजनी गटाच्या लढतीत सायप्रसच्या पेट्रोसवर विजय मिळवून कांस्य निश्चित केले.
स्पर्धेसाठी 'कार' विकणाऱ्या सुशीला देवीने घडविला इतिहास, ज्युदोत जिंकले रौप्यपदक!
#Badminton सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने भारताला मिश्र सांघिक गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सिंगापूरविरुद्ध विजयी सुरुवात करून दिली. भारतीय जोडीने २१-११ व २१-१२ अशा फरकाने सिंगापूरच्या याँग काई टेरी ही व अँडी जून लिएंग यांच्यावर विजय मिळवत भारताल १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-११, २१-१२ असा सोपा विजय मिळवताना भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या लढतीत लोह किनचे आव्हान २१-१८ व २१-१५ असे परतवून लावताना भारताला ३-० अशा विजयासह अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. २०१८चे सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने २०२२ मध्येही सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला.
#Boxing भारताचा बॉक्सर अमित पांघल याने ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने नामरी बेरीरवर ५-० असा विजय मिळवला. आता तो पदकापासून एक विजय दूर आहे.
#Lawn Bowls महिला गटात भारत व न्यूझीलंड यांच्यातली उपांत्य फेरीची लढत अत्यंत चुरशीची झाली. १-६ अशा पिछाडीवरून चार सदस्यीय भारतीय महिलांनी १०-७ अशी आघाडी मिळवली. पण, न्यूझीलंडने पुनरागमन करताना १३-१२ अशी झेप घेतली, परंतु भारतीय महिलांनीही १६-१३ अशी आघाडी घेत बाजी मारन ऐतिहासिक पदक निश्चित केले. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा रानी तिर्की यांचा भारतीय संघात समावेश होता.
#Squash जोश्ना चिनप्पाचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव. कॅनडाच्या हॉली नॉघटनचा ११-९, ११-५ व १५-१३ असा विजय
#Hockey भारतीय पुरुष हॉकी संघाने ४-१ अशी आघाडी असूनही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४-४ अशा बरोबरीवर समाधान मानले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ सुमार झाला#Squash सौरव घोषालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या ग्रेग लोबानचा ११-५, ८-११, ११-७, ११-३ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली.