शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Commonwealth Games 2022 : गतविजेत्या टेबल टेनिस संघाचा पराक्रम, नायजेरियाला नमवून पक्कं केलं आणखी एक पदक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 2:12 AM

Commonwealth Games 2022 Table Tennis : पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही अटीतटीच्या लढतीत नायजेरियाचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

Commonwealth Games 2022 Table Tennis : बॅडमिंटन मिश्र सांघिक गटात भारताने अंतिम फेरीत प्रवेश करून किमान रौप्यपदक निश्चित केले. त्यापाठोपाठ पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही अटीतटीच्या लढतीत नायजेरियाचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१८च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यासह एक पदक निश्चित केले. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर सिंगापूरचे कडवे आव्हान असणार आहे. दरम्यान, सोमवारी भारताने आणखी तीन पदकांची कमाई करताना पदकसंख्या ९ अशी केली आहे. वेटलिफ्टिंग हरजिंदर कौरने कांस्य, ज्युदोत सुशीला देवीने रौप्य, तर विजय कुमारने कांस्यपदक पटकावले. 

भारताचे नववे पदक! वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने जिंकून दिले आणखी एक कांस्यपदक

#Table Tennis दुहेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या हरमीत देसाई व साथियन ज्ञानसेकरन यांनी विजयी सुरुवात करून दिली. या जोडीने नायजेरियाच्या बोडे एबिडन व ओलाजिदे ओमोयाटो यांचा  ११-८, ११-७, ११-७ असा पराभव केलाय त्यानंतर भारताचा सर्वात अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलने पुरुष एकेरीत विजय मिळवला. २००६ पासून राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेणारा कमल आतापर्यंत एकदाही पदकावीना घरी परतलेला नाही. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत कादरी अरुनाचा ११-९, ७-११, ११-८, १५-१३ असा चुरशीच्या लढतीत  पराभव  करताना भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. पुरुष एकेरीची दुसरी लढतही चुरशीची झाली आणि त्यातही ज्ञानसेकरनने बाजी मारताना ओमोयाटोवर ११-९, ४-११, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. ३-० अशा विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर सिंगापूरचे आव्हान आहे. 

#Badminton सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने भारताला मिश्र सांघिक गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सिंगापूरविरुद्ध विजयी सुरुवात करून दिली. भारतीय जोडीने २१-११ व २१-१२ अशा फरकाने सिंगापूरच्या याँग काई टेरी ही व अँडी जून लिएंग यांच्यावर विजय मिळवत भारताल १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-११, २१-१२ असा सोपा विजय मिळवताना भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या लढतीत लोह किनचे आव्हान २१-१८ व २१-१५ असे परतवून लावताना भारताला ३-०  अशा विजयासह अंतिम फेरीत प्रवेश करून दिला.  २०१८चे सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने २०२२ मध्येही सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला. 

  • #Boxing भारताचा बॉक्सर अमित पांघल याने ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने नामरी बेरीरवर ५-० असा विजय मिळवला. आता तो पदकापासून एक विजय दूर आहे.   
  • #Hockey भारतीय पुरुष हॉकी संघाने ४-१ अशी आघाडी असूनही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४-४ अशा बरोबरीवर समाधान मानले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ सुमार झाला 
टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTable Tennisटेबल टेनिस